The Kapil Sharma Show First Promo : कॉमेडीचा ओव्हरडोस घेऊन परतला 'द कपिल शर्मा शो', या दिवसापासून नवा सीझन सुरू

प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माचा लोकप्रिय कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो' जोरदार कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे.
Kapil Sharma
Kapil Sharmasaam Tv
Published On: 

The Kapil Sharma Show First Promo | मुंबई : प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माचा(Kapil Sharma) लोकप्रिय कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो'(The Kapil Sharma Show) जोरदार कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकताच 'द कपिल शर्मा शो'चा प्रोमो रिलीज झाला आहे. ज्यामध्ये कॉमेडी किंग कपिल शर्मा त्याच्या शोच्या सर्व कलाकारांसोबत दमदार सुरुवात करताना दिसत आहे.

Kapil Sharma
Raju Srivastava Health Update | राजू श्रीवास्तव शुद्धीवर आल्याच्या अफवा, मुलीनंच दिली नवी अपडेट

'द कपिल शर्मा शो'च्या या प्रोमो व्हिडीओसह, या शोच्या प्रीमियरची तारीखही समोर आली आहे. कपिल शर्मा त्याच्या संपूर्ण टीमसोबत १० सप्टेंबरपासून पुन्हा एकदा टीव्हीवर परतणार आहे.

जून महिन्यात मागचं पर्व संपल्यानंतर प्रेक्षक 'द कपिल शर्मा शो'च्या नव्या सीझनची आतुरतेने वाट पाहत होते. खरं तर कपिल शर्माचा हा शो वर्षानुवर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. टीव्हीचा सर्वोत्कृष्ट कॉमेडी शो म्हणून पुन्हा एकदा कपिल शर्मा त्याच्या संपूर्ण टीमसोबत प्रेक्षकांना हसून हसून लोटपोट करण्यासाठी येत आहे. सोनी वाहिनीने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर कपिल शर्मा शोचा नवीन प्रोमो व्हिडीओ शेअर केला आहे.

Kapil Sharma
मी निर्दोष, माझी मुक्तता करावी; पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राची कोर्टाला याचिकेद्वारे विनंती

या व्हिडीओमध्ये कपिल शर्मा जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याचे दिसत आहे. यासोबतच तो आपल्या शोमधील सर्व कलाकारांची ओळख करून देतोय. पण यादरम्यान कपिल शोमधील त्याची पत्नी म्हणजेच कलाकार सुमोना चक्रवर्तीला ओळख देण्यास नकार देतो. कपिल सुमोनाकडे बघतो आणि विचारतो, 'या ताई कोण आहेत?' यावर संपूर्ण टीम त्याला तुझी बायको असल्याचे सांगतात. ते नाकारून कपिल एका दुसऱ्या महिलेला आपली बायको समजून तिच्याकडे धावत जातो, तेव्हा शोची जज अर्चना पूरण सिंह रागात त्याला ओढताना दिसते.

'द कपिल शर्मा शो'चा हा लेटेस्ट प्रोमो व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडला आहे. कपिल शर्माच्या या शोचा हा प्रोमो व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कपिल शर्मा हा कॉमेडी शो १० सप्टेंबरपासून सोनी टीव्हीवर रात्री ९.३० वाजता प्रसारित होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com