मी निर्दोष, माझी मुक्तता करावी; पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राची कोर्टाला याचिकेद्वारे विनंती

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती उद्योगपती राज कुंद्राने मुंबईच्या दंडाधिकारी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
Raj Kundra
Raj KundraSaam Tv

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा(Shilpa Shetty) पती उद्योगपती राज कुंद्राने(Raj Kundra) मुंबईच्या दंडाधिकारी न्यायालयात(Court) याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्याने अ‍ॅपद्वारे कथितरित्या अश्लील चित्रपट निर्मिती आणि ते अपलोड केल्याच्या एका प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्याची विनंती केली आहे. राज कुंद्रा याने या प्रकरणातून आरोपमुक्त होण्यासाठी न्यायालयाचं दार ठोठावलं आहे.

Raj Kundra
Milind Soman Emergency First Look : कंगना रनौतच्या 'इमर्जन्सी'त होणार मिलिंद सोमनची एन्ट्री

राज कुंद्राने या प्रकरणातून आर्थिक किंवा अन्य प्रकारचा नफा कमावल्याचे कोणतेही पुरावे पोलिसांना मिळालेले नाहीत. याशिवाय कथित चित्रीकरण आणि प्रसारणाबाबत कोणताही आरोप केलेला नाही, याकडे त्याने याचिकेद्वारे लक्ष वेधले आहे. न्यायालयाने फिर्यादी पक्षाला ८ सप्टेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे.

दरम्यान, राज कुंद्रा याला जुलै २०२१ मध्ये अटक करण्यात आली होती. सध्या त्याची जामिनावर सुटका झाली आहे. अलीकडेच राज कुंद्राचे वकील प्रशांत पाटील यांनी देखील २० जुलै रोजी दोषमुक्तीसाठी अर्ज केला होता, त्याचा तपशील बुधवारी समोर आला आहे.

Raj Kundra
उर्फी जावेदनं आता तर हद्दच ओलांडली; असा ड्रेस घातला की फॅन्स थेट 'क्लिन बोल्ड'

या प्रकरणात एका महिलेने राज कुंद्रावर गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर राज कुंद्रा आणि इतरांविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला होता. नंतर हे प्रकरण पुढील तपासासाठी मुंबई गुन्हे शाखेकडे देण्यात आले होते. राज याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

राज कुंद्राच्या मुंबईतील कार्यालय आणि जुहूच्या बंगल्यावरही पोलीस अधिकाऱ्यांनी छापेमारी केली होती. राजला गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जामीन मंजूर झाला होता. त्याच्या सुटकेच्या काही महिन्यांनंतर राज कुंद्राने एका निवेदनात म्हटले होते की, संपूर्ण प्रकरण हा त्याच्याविरुद्धचा कट होता. यात पूर्णपणे अडकवण्यात आले आहे, असा दावा त्याने केला होता.

दरम्यान, अलीकडेच माझ्याविरोधात अनेक दिशाभूल करणारे आणि बेजबाबदार लेख लिहिले गेले. मी शांत राहिलो आहे, त्याचा गैरफायदा घेतला आहे. माझा पोर्नोग्राफी प्रकरण आणि वितरणाशी काहीही संबंध नाही. हा सगळा मला अडकवण्याचा डाव आहे, असंही त्याने म्हटलं होतं.

हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे मी काही अधिक बोलू शकत नाही, परंतु मी खटल्याला सामोरे जाण्यास सक्षम आहे आणि माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. तिथे सत्याचाच विजय होईल, असा विश्वास त्यानं व्यक्त केला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com