Milind Soman Emergency First Look : कंगना रनौतच्या 'इमर्जन्सी'त होणार मिलिंद सोमनची एन्ट्री

कंगना रनौतने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून मिलिंद सोमणचा लूक शेअर केला आहे.
Milind Soman
Milind SomanSaam Tv
Published On: 

मुंबई : बॉलिवूड क्वीन कंगना रनौतच्या 'इमर्जन्सी'(Emergency) चित्रपटाचा एकेक लूक हळूहळू समोर येत आहेत. माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांची व्यक्तिरेखा ज्याप्रकारे कंगनाने साकारली आहे, त्याचं कौतुक होत आहे. कंगना रनौतच्या 'इमर्जन्सी' या चित्रपटाची सध्या खूप चर्चा होत आहे. कंगना रनौतशिवाय(Kangana Ranaut) अनुपम खेर, श्रेयस तळपदे, महिमा चौधरी आणि आता मिलिंद सोमण या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. कंगना रनौतने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून मिलिंद सोमणचा लूक शेअर केला आहे.

Milind Soman
उर्फी जावेदनं आता तर हद्दच ओलांडली; असा ड्रेस घातला की फॅन्स थेट 'क्लिन बोल्ड'

कंगना रनौतने मिलिंद सोमणचा फर्स्ट लूक पोस्टर शेअर केला आहे. पोस्ट शेअर करत कंगनाने कॅप्शनमध्ये लिहिले, 'सॅम माणेकशॉ यांच्या भूमिकेत मिलिंद सोमण. भारत-पाक युद्धात भारतीय सीमांचं रक्षण करण्यात ज्यांनी महत्वाची भूमिका बजावली असे सॅम माणेकशॉ. #इमर्जन्सी'.

Milind Soman
सारा तेंडुलकर-शुभमन गिलचं ब्रेकअप? त्यांच्या एका कृतीमुळे चर्चांना उधाण

'इमर्जन्सी' चित्रपटात मिलिंद सोमण फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. मिलिंद सोमणला सॅम यांच्या लूकमध्ये ओळखणे कठीण होतंय. सॅम माणेकशॉ हे भारतीय सैन्यात सर्वांचे आवडते होते. सॅम माणेकशॉ यांची लोकप्रियता केवळ भारतातच नाही, तर पाकिस्तानातही होती. सॅम माणेकशॉ यांचा जन्म पंजाबमध्ये झाला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने १९७१ च्या युद्धात पाकिस्तानचा पराभव केला. ३ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानी सैन्याने भारतावर हल्ला केला. पण भारतानेही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आणि १३ दिवसांतच पाकिस्तानी सैन्याने शस्त्र खाली टाकले. पाकिस्तानच्या ९० हजारांहून अधिक सैनिकांनी आत्मसमर्पण केले.

कंगनाच्या 'इमर्जन्सी' या चित्रपटामध्ये अनेक दिग्गज कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटात कंगना ही माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्याचबरोबर अनुपम खेर हे जयप्रकाश नारायण यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटलबिहारी बाजपेयी यांची भूमिका श्रेयस तळपदे साकारणार असून, कॅन्सरमधून बरी झालेली महिमा चौधरी पुपुल जयकरच्या भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com