

मुंबई : इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेद(Urfi Javed) ही सध्या तुफान चर्चेत आहे. सोशल मीडियावर तिला 'व्हायरल गर्ल' म्हणून ओळखलं जाते. अतरंगी आणि बिनधास्त स्टाइलमुळं चर्चेत असलेल्या उर्फीनं आता हद्दच पार केली आहे. तिने चक्क आकाशगंगेशी आपली मैत्री केली आहे. नेहमीच नवनवीन प्रयोग करत प्रसिद्धीझोतात राहणाऱ्या उर्फीचा नवीन लूक समोर आला आहे. ज्यामध्ये उर्फीची चमक बघायला मिळते.
उर्फी जावेद ही(Social Media) सोशल मीडिया इ्न्फ्ल्युएन्सर आहे. अनेकदा उर्फी तिच्या बोल्ड आणि हॉट लूकने इंटरनेटचा पारा वाढवते. ती नेहमीच तिच्या फॅशन स्टाईलने चाहत्यांना प्रभावित करते. ज्यामुळे अनेकदा ती ट्रोलिंगचा देखील बेधडकपणे सामना करते. पुन्हा उर्फी तिच्या हटक्या स्टाईलने चाहत्यांच्या भेटीला आली आहे.
उर्फी ही एक 'फॅशन आयकॉन' म्हणून ओळखली जाते. तिच्या फॅशन सेन्सची चाहत्यांना देखील फार उत्सुकता असते. उर्फीच्या फॅशनचा एक विशिष्ट चाहतावर्ग आहे. उर्फीचा कोणताही फोटो सोशल मीडियावर चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतो. अनेक जण तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट करून तिच्या फॅशन सेन्सचे कौतुक करतात. उर्फीच्या भन्नाट फॅशन निवडीमुळे काही डिझायनरसुध्दा थक्क झाल्या आहेत.
अलीकडेच 'व्हायरल गर्ल' उर्फी जावेद ही एका अप्रतिम आउटफिटमध्ये दिसली. तिचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये उर्फी शिमरी सी- थ्रू ड्रेसमध्ये मोहक पोज देताना दिसत आहे. बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध वार्ताहरानं तिचा व्हिडीओ शेअर केला आहे. उर्फीने बॉडी हॅगिंग ड्रेस परिधान केला आहे. ज्यामध्ये पुन्हा एकदा उर्फीचा हॉट बोल्ड लूक दिसतो आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये उर्फीने तिचा हा नवीन प्रयोग चक्क गॅलेक्सी प्रेरित असल्याचे सांगितले आहे. मेकअपसह चंद्र आणि तारे अशा हेअरस्टाईलने लूक पूर्ण केला आहे. उर्फीची ही चमक चाहत्यांना घायाळ करते आहे.
उर्फी जावेदचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. तिच्या या व्हीडीओला काही तासांत हजारो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. तर काहींना तिची नवीन स्टाईल आवडली नाही आणि त्यांनी तिला ट्रोल करायला देखील सुरूवात केली आहे. 'या ड्रेसमध्ये ती सुंदर दिसण्याऐवजी शेमलेस दिसत आहे', असे एका यूजरनं म्हटलं आहे. 'हिला तर आता गॅलेक्सीमध्ये पाठवायला पाहिजे,' असा टोला एका यूजरनं लगावला आहे. तर अनेकांनी तिच्या या फॅशन सेन्सचे कौतुक देखील केले आहे.
उर्फी जावेद नेहमीच तिच्या अतरंगी स्टाईलमध्ये चाहत्यांच्या भेटीला येत असते. अलीकडेच उर्फीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये फॅशनिस्टा उर्फीने कलरफुल स्टोनची रिवीलिंग बिकनी घातली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.