Laal Singh Chaddha on OTT : 'लाल सिंग चड्ढा' या दिवशी होणार ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज !

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि करीना कपूरचा 'लाल सिंह चड्ढा' चित्रपट रिलीज होण्यास काही दिवस उरले आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर म्हणजे ११ ऑगस्ट २०२२ रोजी थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहे.
Laal Singh Chaddha Image
Laal Singh Chaddha ImageSaam Tv
Published On: 

मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Amir Khan) आणि करीना कपूरचा 'लाल सिंह चड्ढा'(Laal Singh Chaddha) चित्रपट रिलीज होण्यास काही दिवस उरले आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर म्हणजे ११ ऑगस्ट २०२२ रोजी थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. आमिर खान सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. दरम्यान, 'लाल सिंह चड्ढा' कडून एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ज्यामुळे चाहते हा चित्रपट रिलीज होण्याची आतुरतेने वाट बघत आहेत. माहितीनुसार 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटाची ओटीटी रिलीज डेट जाहीर झाली आहे.

Laal Singh Chaddha Image
शमिता शेट्टीसोबतच्या ब्रेकअपवर बिग बॉस फेम अभिनेत्यानं ट्रोलर्सना फटकारले, म्हणाला..

'लाल सिंग चड्ढा' ११ ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होत आहे. माहितीनुसार, आमिर खानचा हा चित्रपट सुमारे ६८-७० दिवसांनी ओटीटीवर प्रदर्शित होऊ शकतो. तथापि, अद्याप या अहवालांवर निर्मात्यांचे अधिकृत विधान बाहेर आलेले नाही किंवा आमिर खानने ओटीटी रिलीजच्या तारखेबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.

Laal Singh Chaddha Image
Alia Bhatt : आलिया भट्टला कुणीतरी करतंय 'मिस'; सोशल मीडियावरील पोस्टवर केली कमेंट

ओटीटी प्लॅटफॉर्मवर लाल सिंग चड्ढाच्या रिलीजची ही अटकळ खरी ठरली, तर चाहते लाल सिंग चड्ढाला सप्टेंबरच्या अखेरीपर्यंत किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीपर्यंत घरी बसून पाहू शकतात. लाल सिंग चड्ढा कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होऊ शकतो हे अजून उघड झालेले नाही.

आमिर खान आणि करीना कपूर व्यतिरिक्त 'लाल सिंह चड्ढा'मध्ये नागा चैतन्य आणि मोना सिंह देखील महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. आमिर खान, किरण राव आणि वायाकॉम१८ स्टुडिओज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट हॉलिवूड चित्रपट 'फॉरेस्ट गंप'चा हिंदी रिमेक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com