The Bengal Files Trailer Event: विवेक रंजन अग्निहोत्री यांच्या 'द बंगाल फाइल्स' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे, ज्यामध्ये अनुपम खेर महात्मा गांधींच्या भूमिकेत दिसत आहेत. याशिवाय मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी आणि दर्शन कुमार सारखे कलाकारही वेगवेगळ्या भूमिकांमध्ये आहेत. ६ सप्टेंबर २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात बंगालच्या फाळणीपूर्वी झालेल्या हत्याकांडाचे दर्शन घडवले आहे, जे सर्वांनाच भावूक करणार आहे. एवढेच नाही तर कोलकातामध्ये ट्रेलर रिलीजदरम्यान गोंधळही झाला आहे.
'द बंगाल फाइल्स' या चित्रपटाचा ट्रेलर शनिवारी, १६ ऑगस्ट रोजी कोलकातामध्ये प्रदर्शित झाला. यापूर्वी त्यांच्या कार्यक्रमाचे ठिकाण रद्द करण्यात आल्याचे वृत्त होते. विवेक रंजन अग्निहोत्री यांनी स्वतः एका व्हिडिओद्वारे ही माहिती लोकांसोबत शेअर केली. त्यांनी सांगितले की ते शहरात पोहोचल्यावर इव्हेंटचे ठिकाण रद्द करण्यात आले. त्यांनी विनंती केली कि, ट्रेलर उद्या कोलकातामध्ये लाँच होईल. कृपया हा व्हिडिओ शेअर करा आणि आम्हाला पाठिंबा द्या.'
'द बंगाल फाइल्स'च्या ट्रेलर लाँच दरम्यान गोंधळ
माध्यमांच्या वृत्तानुसार, 'द बंगाल फाइल्स'चा ट्रेलर लाँच कार्यक्रम कोलकाता येथील आयटीसी रॉयल बंगाल नावाच्या हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला होता. चित्रपटाच्या घोषणेनंतर काही वेळातच हा कार्यक्रम थांबवण्यात आला. येथे घोषणाबाजी सुरू झाल्यामुळे येथे गोंधळ उडाला आणि त्यांना ट्रेलर लाँच रोखण्यासाठी हॉटेलच्या आत लाईट घालवण्यात आली. विवेक रंजन अग्निहोत्री म्हणाले की ही हुकूमशाही आहे. हॉटेलच्या आत दोनदा लाँच थांबवण्यात आला.
'द बंगाल फाइल्स'मधील मिथुन चक्रवर्ती यांची सून
चित्रपटाचा ट्रेलर लाँच कार्यक्रम कोलकाता येथे झाला. परंतु वृत्तानुसार, तिथे गोंधळ झाला. ट्रेलरच्या एका दृश्यात मदालसा शर्मा देखील दिसत आहे. जी 'अनुपमा' चित्रपटाने प्रसिद्ध झाली आणि मिथुन चक्रवर्ती यांची सून आहे. तसेच, 'गदर २' मधील सिमरत कौर देखील चित्रपटात सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला असे सांगितले जात आहे की पश्चिम बंगालमध्ये दोन संविधाने चालतात. एक हिंदूंचा आणि एक मुस्लिमांचा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.