Jana Nayagan Teaser
HBD Thalapathy VijaySAAM TV

HBD Thalapathy Vijay : थलपती विजयची 'पहिली डरकाळी'; 'जन नायकन'चा धमाकेदार टीझर, पाहा VIDEO

Jana Nayagan Teaser : साऊथ सुपरस्टार थलपती विजय यांचा 'जन नायकन' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे.
Published on

साऊथ सुपरस्टार थलपती विजय (Thalapathy Vijay) यांचा आज (22 जून 2025) वाढदिवस आहे. आज थलपती विजय 51 वर्षांचे झाले आहेत. आपल्या वाढदिवसाला थलपती विजय यांनी चाहत्यांना छान सरप्राइज दिले आहे. थलपती विजय यांच्या शेवटच्या चित्रपटाची 'जन नायकन' ची (Jana Nayagan Teaser) पहिली झलक नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

'जन नायकन' ची 'पहिली डरकाळी' आज रिलीज करण्यात आली आहे. याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. 'जन नायकन'च्या टीझरची सुरुवात विजय यांच्या आवाजाने होते. ते म्हणतात की, "तुम्ही सगळे माझ्या हृदयात जिवंत राहाल" आणि लगेचच एक धडकी भरवणारा सीन पाहायला मिळतो. ज्यात पोलिसांच्या गणवेशात विजय, हातात लाठी आणि स्फोटांनी भरलेल्या रणभूमीतून शांतपणे चालताना दिसतात. हा सीन म्हणजे ताकद, आत्मविश्वास आणि उदात्ततेचा संगम आहे.

'जन नायकन' चित्रपटाचा एक भन्नाट पोस्टर देखील रिलीज करण्यात आला आहे. पोस्टमध्ये थलपती विजय यांचा खूप कमाल लूक पाहायला मिळत आहे. पोस्टरमध्ये विजय एका लेदरच्या सिंहासनावर रॉयल पोझमध्ये बसलेले दिसत आहेत. हातात तलवार, मागे धुरकट वातावरण पाहायला मिळत आहे. तोच राजा, योद्धा आणि नेता सगळं एका झटक्यात दाखवणारी झलक पाहून चाहते चित्रपटासाठी खूप उत्सुक झाले आहेत.

रिलीज डेट काय?

'जन नायकन' ही फक्त एक सिनेमा नसून विजयच्या तीन दशकांच्या स्टारडमचा शेवटचा सुवर्णपदरी अध्याय आहे. एच. विनोद यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. अनिरुद्ध रविचंदर यांनी संगीत दिले आहे. थलपती विजय यांचा 'जन नायकन' चित्रपट 9 जानेवारी 2026ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Jana Nayagan Teaser
Tejashree-Subodh : तेजश्री प्रधान अन् सुबोध भावे छोटा पडदा गाजवायला सज्ज, 'त्या' पोस्टनं वेधलं लक्ष

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com