The Raja Saab: 'शाहरुख वाला प्यार...'; प्रभासच्या 'द राजा साब' मधील खरा भूत कोण? पाहा जबरदस्त टीझर

The Raja Saab Teaser: प्रभासच्या बहुप्रतिक्षित 'द राजा साब' चित्रपटाचा टीझर ५ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. २ मिनिट २८ सेकंदाच्या या टीझरमध्ये प्रभासचे अनेक वेगवेगळे स्टाईल पाहायला मिळत आहेत.
The Raja Saab
The Raja SaabSaam Tv
Published On

The Raja Saab: सुपरस्टार प्रभास अनेकदा अ‍ॅक्शन किंवा रोमँटिक ड्रामा चित्रपटांमध्ये दिसला आहे. गेल्या वेळी तो 'सलार' आणि 'कल्की २८९८ एडी' सारख्या मोठ्या चित्रपटांचा भाग होता, जे संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणात हिट ठरले झाले. यावेळी अभिनेत्याचा अवतार नेहमीपेक्षा थोडा वेगळा असणार आहे, यावेळी 'द राजा साहेब'मध्ये विनोदासोबतच हॉरर आणि अ‍ॅक्शनचा जबरदस्त डोसही पाहायला मिळणार आहे.

दिग्दर्शक मारुती दिग्दर्शित या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. प्रभासचा आगामी 'द राजा साहेब' हा एक काल्पनिक-भयपट चित्रपट आहे. यामध्ये केवळ प्रभासच नाही तर संजय दत्तचाही वेगळा अवतार पाहायला मिळत आहे. २.२८ मिनिटांच्या या टीझरमध्ये प्रभास अ‍ॅक्शनपासून ते कॉमेडी आणि रोमान्सही करताना दिसतो. पण, या टिझरमध्ये विशेष चर्चा होत आहे संजय दत्तची. या चित्रपटातील त्याच्या लूकने सर्वांना आश्चर्यचकित केल आहे.

The Raja Saab
Don 3: डॉन 3 मध्ये कियारा अडवाणीच्या ऐवजी क्रिती सॅननची एन्ट्री? 'या' व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण

संजय दत्तचा साम्राज्य आणि झपाटलेला महाल

'द राजा साब'च्या टीझरमध्ये संजय दत्त हा सर्वात मोठा सरप्राईजिंग फॅक्टर आहे. तो या कथेत खलनायकाची भूमिका साकारत आहे. चित्रपटाची कथा संजय दत्तच्या साम्राज्य आणि झपाटलेल्या महालाशी संबंधित आहे, यामध्ये प्रभास एका अनोळख्या भूमिकेत दिसत आहे. संजय दत्त एका मृत राजाची भूमिका साकारत आहे, जो महालाला आपले शरीर बनवतो.

The Raja Saab
Sagarika-Zaheer Khan Baby: सागरिका आणि झहीरने दाखवली मुलाची पहिली झलक; नेटकरी म्हणाले, भारताला लवकरच एक क्रिकेटर...

'द राजा साब'मध्ये तीन अभिनेत्री आहेत, निधी अग्रवाल आणि मालविका मोहनन यांच्यासोबत रिद्धी कुमार यात महत्त्वाची भूमिका साकारत आहे. प्रभास आणि मालविका मोहनन यांच्यातील केमेस्ट्रीची झलक टीझरमध्ये दिसते. तसेच, तिन्ही अभिनेत्री प्रभाससोबत वेगवेगळ्या शैलीत दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com