
मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) सध्या तिच्या अभिनयामुळे कमालीची चर्चेत आहे. हेमांगी कवी फक्त मराठी सिनेसृष्टीत नाही तर, हिंदी टेलिव्हिजनसृष्टीतही आपल्या चाहत्यांचं मनोरंजन करीत आहे. गेल्या आठवड्यातच अभिनेत्रीला ‘कैसे मुझे तुम मिल गयी’ या मालिकेसाठी ‘झी रिश्ते अवॉर्ड २०२४’ पुरस्कार सोहळ्यामध्ये ‘बेस्ट माँ’ म्हणजेच सर्वोत्कृष्ट आईच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अशातच आता अभिनेत्रीने या मालिकेतील तिच्या सहकलाकारासाठी एक खास पोस्ट केली आहे. त्या पोस्टमुळे अभिनेत्री चर्चेत आली आहे. (Marathi Actress)
या मालिकेमध्ये हेमांगी कवी प्रमुख भूमिकेत असून तिच्यासोबत श्रीती झा सुद्धा मुख्य भूमिकेत आहे. नुकतंच अभिनेत्री श्राती झा चा वाढदिवस झाला. तिच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्री हेमांगी कवीने एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली होती. सध्या तिच्या पोस्टची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. अभिनेत्री आपल्या पोस्टमध्ये म्हणते, “सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट सहकारी, साधी, गोड, दयाळू, गोंडस, मजबूत, मोहक, बुद्धिमान आणि मजेदार अशा माझ्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अस्सल सुंदर, विश्वासार्ह व्यक्ती आणि मला भेटलेली एक स्टार!” (Social Media)
अभिनेत्री आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हणते, “तुझ्यामध्ये फक्त एक वाईट गोष्ट आहे, ती म्हणजे तुझ्याकडून प्रशंसा करून घेणे आणि तुझी प्रशंसा करणं. मला माहित आहे की, प्रशंसा तुला खूप अस्वस्थ करते. पण आज तुझा वाढदिवस आहे. आणि आमच्या आयुष्यात तुझ्यासारखे गोड व्यक्तिमत्व आल्याने मी धन्य झाले. जर मी मुलगा असते ना तर तुझ्यासोबत लग्नासाठी मागेच लागले असते. इतकी सुंदर का आहेस तू ? बेटा तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! ” (Tv Serial)
‘कैसे मुझे तुम मिल गयी’ मालिकेबद्दल सांगायचे तर, ही मालिका गेल्या वर्षापासूनच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अवघ्या काही दिवसांतच मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य निर्माण केले आहे. मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत, श्रीती झा, अर्जित तनेजा, हेमांगी कवी, राजेश्वरी दत्ता सह अनेक स्टारकास्ट मुख्य भूमिकेत आहे. (Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.