झी मराठीवरील प्रसिद्ध कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’च्या (Chala Hawa Yeu Dya) माध्यमातून प्रेक्षकांना खळखळवून हसवणारा अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) सध्या चर्चेत आहे. गेल्या १० वर्षांपासून कुशल बद्रिके ‘चला हवा येऊ द्या’ या कॉमेडी शोच्या माध्यमातून तो प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करीत आहे. आपल्या दमदार कॉमेडी आणि अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या कुशलने ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवरून एक शेवटचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने मायबाप प्रेक्षकवर्गाचे ‘चुकले असले तर क्षमा असावी’, असं म्हणत माफी मागितली. (Marathi Actors)
‘चला हवा येऊ द्या’ मालिकाचा काल म्हणजे १७ मार्चला शेवटचा भाग प्रसारित झाला आहे. 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम एका अल्पविरामानंतर हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पुन्हा हा शो केव्हापासून सुरू होणार याबद्दलची माहिती झी मराठीने सांगितलं नाही. नुकतंच कुशल बद्रिकेने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'चला हवा येऊ द्या' च्या सेटवरील एक व्हिडीओ शेअर केला आहे. “माय बाप प्रेक्षकहो, सगळ्यांचे मनापासून आभार. चूक भूल द्यावी घ्यावी...” असं कॅप्शन देत अभिनेत्याने व्हिडीओ शेअर केला आहे. (Zee Marathi)
कुशल 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवरील शेवटचा व्हिडीओ शेअर करताना, भावुक झाला होता. १० वर्ष प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केल्यानंतर शो पुन्हा नव्या जोमाने सुरू होणार आहे. सध्या कुशल बद्रिके सोनी टेलिव्हिजनवरील ‘मॅडनेस मचायेंगे’ या हिंदी कॉमेडी शोच्या माध्यमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कुशलला फक्त चाहत्यांकडूनच नाही तर अनेक सेलिब्रिटींकडूनही खूप प्रेम मिळत आहे.
कुशलच्या व्हिडीओवर संतोष जुवेकरने कमेंट केली की, "तुम्ही परत येणार सगळे नवीन रूपात नवीन जोमात. 'पुराना जायेगा तभीतो नया आयेगा.' लव्ह यू ऑल आणि खूप खूप प्रेम तुम्ही सगळ्यांनी खूप हसवून हसवून आठवणी आणि खळखळते हसण्याचे क्षण आम्हाला दिले आहेत." (Social Media)
"बघता बघता कधी १० वर्ष झाली कळलं सुद्धा नाही... स्वतःचे दुःख बाजूला ठेवून, आम्हा प्रेक्षकांना तुम्ही सतत हसवलंत... त्यासाठी मनःपूर्वक आभार, आता सांगायचं झालं तर, आपल्या घरातून कोणी बाहेर गेलं, की कसा आपण त्याची वाट पाहत असतो... त्याच आशेने आम्ही तुमच्या सर्वांची वाट पाहू...",
"तुम्हा सर्वांची ह्या मंचावरची अनेक पात्र आयुष्यभर लक्षात राहतील. या मंचाने फक्त आनंदचे सोहळे दिले. तू या मंचावर जे केलस ते जीव ओतून केले आहेस.. त्यासाठी किती कष्ट घेतले आहेस हे सर्वश्रृत आहे... नवीन प्रवास सुरू होताना जून आनंदच गाव सोडव लागतं पण म्हणून त्या गावाची माया तुटत नाही... तुझ्या पुढच्या आनंदच्या सोहळ्याला खूप खूप शुभेच्छा" अशा कमेंट्स चाहत्यांनी केली आहे. (Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.