Kiran Mane On Sharad Ponkshe Daughter: “सूर्यावर थुंकण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारा माथेफिरू...” किरण मानेची शरद पोंक्षेंच्या लेकीसाठी स्पेशल पोस्ट

Kiran Mane Post: शरद पोंक्षेंच्या लेकीसाठी अभिनेता किरण मानेने एक खास पोस्ट केली.
Kiran Mane Special Post For Sharad Ponkshe Daughter
Kiran Mane Special Post For Sharad Ponkshe DaughterSaam Tv
Published On

Kiran Mane Special Post For Sharad Ponkshe Daughter: किरण माने नेहमीच आपल्या सोशल मीडिया पोस्ट वरून अनेकदा चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपूर्वी किरण माने आणि मराठी ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांच्यातील पोस्ट वॉर बरेच चर्चेत राहिले होते. त्यांच्या मध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून पोस्ट वॉर रंगलं होतं..अशातच गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेते शरद पोंक्षे यांनी त्यांची लेक वैमानिक झाल्याची माहिती पोस्ट करून दिली. नुकतंच शरद पोंक्षेंच्या लेकीसाठी अभिनेता किरण मानेने एक खास पोस्ट केली.

Kiran Mane Special Post For Sharad Ponkshe Daughter
Sonu Sood Birthday: खराखुरा 'हिरो नं १', महाराष्ट्रात फक्त ५ हजार घेऊन आला, नाव कमावलं; आता अख्खी मुंबई जिंकली

सध्या अभिनेते शरद पोंक्षेंची पोस्ट बरीच चर्चेत आली आहे.आपल्या लेकीच्या कामाबद्दल कौतुक करताना, त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्याचा उल्लेख केल्यामुळे त्यांच्यावर मनोरंजन व राजकीय क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सडकून टीका केल्यानंतर आता अभिनेते किरण माने यांनी एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी शरद पोंक्षे किंवा त्यांच्या मुलीचं नाव घेतलेलं नाही पण अप्रत्यक्ष त्यांच्याबद्दलच ती पोस्ट आहे. सध्या त्यांची ती पोस्ट बरीच चर्चेत राहिली आहे.

किरण माने आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, “पोरी, नव्या जगात नवी उड्डाणं घे. तुझ्या करीयरनं छान ‘टेक ऑफ’ घेतलाय. आता तू जगभर फिरशील. मात्र सगळ्या सीमा पार करून खुल्या आसमंतात भरारी घेताना तुला आश्चर्याचे अनेक धक्के बसतील. घरात लहानपणापासून तुझ्या घरातल्या जवळच्या माणसानं, तुझ्या मनात ज्या थोर व्यक्तीविषयी द्वेष पेरलाय, ती व्यक्ती जगभर पूजनीय आहे, हे कळल्यावर मनामेंदूला बसणार्‍या हादर्‍याची आत्तापासून तयारी कर. जाशील त्या देशात तुला महात्मा गांधींच्या देशातली मुलगी म्हणून ओळखले जाईल. जाशील त्या गांवात तुला बापूजींचा पुतळा दिसेल !”

Kiran Mane Special Post For Sharad Ponkshe Daughter
Kangana Ranaut Criticized Karan Johar: ‘करण जोहर तुला लाज वाटायला हवी, तू...’; ‘रॉकी और रानी’ सिनेमावरून कंगना रणौत भडकली, रणवीरलाही सुनावलं

आपल्या पोस्टमध्ये पुढे तो म्हणतो, “ऑस्ट्रेलियात ब्रिस्वेनमध्ये तुला गांधी भेटेल. ताजीकिस्तानमधल्या ड्युशान्बेमध्येही तुला महात्म्याच्या पुतळ्याचे दर्शन होईल. स्पेनच्या बर्गोस शहरात, चायनाच्या बिजिंगमध्ये, मॉरीशस, सुरीनाम, पोलंड, कोरीया जाशील तिथे गांधी,गांधी आणि गांधीच असेल. इंग्लंडमध्ये लंडन,वेस्टमिन्स्टर अशा अनेक शहरात तुला गांधीपुतळा दिसेल. अमेरीकेत तर भारताखालोखाल विक्रमी संख्येनं तुला आपल्या महात्म्याची मूर्ती दिसेल. गांधीविचारापुढं नतमस्तक होणारं हे सगळं जग वेडं आहे, की या सुर्यावर थुंकण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारा माणूस माथेफिरू आहे, याचा तू गांभीर्यानं विचार करू लागशील.”

पुढे किरण म्हणतो, “...हा विचार करेस्तोवर अचानक तुला दुसरा हादरा बसेल. अमेरीकेत कोलंबिया विश्वविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक दिसेल. लंडनला सर्वांगसुंदर डॉ. भिमराव रामजी आंबेडकर मेमोरीयल दिसेल. हंगेरीला डॉ. आंबेडकर हायस्कूल, इंग्लंडमध्ये वॉल्वरहॅम्प्टन बुद्ध विहार पाहून डोळे दिपतील... कॅनडाची सायमन फ्रेझर युनिव्हर्सिटी आणि जपानची कोयासन युनिव्हर्सिटी यांनी डॉ. आंबेडकरांच्या कार्याची, साहित्याची, शोधनिबंधांची माहिती देणारे विशेष विभाग स्थापलेत ते ही पहाशील. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्येही डॉ. आंबेडकरांचा पुतळा दिसेल.”

Kiran Mane Special Post For Sharad Ponkshe Daughter
Akash Thosar Video : काय झाडी, काय डोंगर अन् काय तो धबधबा; आकाश ठोसरने भरपावसात घेतला गरमागरम भजीचा आस्वाद

“या सगळ्या ठिकाणी जगभरातले विद्यार्थी डॉ. आंबेडकरांनी लिहिलेल्या पुस्तकांचा अभ्यास करताना दिसतील. काहीजण ‘Annihilation of Caste’ वाचत असतील, तर काहीजण ‘The Untouchables: Who were they and why they Became Untouchables’ ची पारायणं करत असतील ! तू आंबेडकरांच्या इंडियामधली आहेस हे कळल्यावर त्या विद्यार्थ्यांना खूप आनंद होईल. ते तुला भारतातल्या हजारो वर्षांच्या अस्पृश्यतेबद्दल अनेक प्रश्न विचारतील. हजारो वर्ष ज्यांना शिक्षणापासून आणि सर्व गोष्टींपासून वंचित ठेवलं गेलं होतं. गुलामगिरीत पिचवलं होतं, ते शोषित-पिडीत आता या इनमिन पाऊणशे वर्षांत कुठपर्यन्त पोहोचलेत अशीही चौकशी करतील. त्यांना हे सांगू नकोस की ‘मी यश मिळवल्यावर, माझ्या घरातल्या जवळच्या व्यक्तीनं त्या बांधवांना सवलतींवरून टोमणे मारले आहेत...’ अजिबात सांगू नकोस हे. कारण जगभर वाईट मेसेज जाईल की या लोकांच्या मनात आजही अस्पृश्यतेचं विष आहे. आपल्या घरात अजून कितीही कचरा असला तरी बाहेरच्यांना तो दिसता कामा नये. त्यामुळं तू त्यांना खोटं हसत बळंबळंच सांग 'सगळं ठीक आहे आमच्याकडे आता.”

Kiran Mane Special Post For Sharad Ponkshe Daughter
Akash Thosar Video : काय झाडी, काय डोंगर अन् काय तो धबधबा; आकाश ठोसरने भरपावसात घेतला गरमागरम भजीचा आस्वाद

किरण आपल्या पोस्टच्या शेवटच्या भागात म्हणतो, “...नंतर मात्र तुझ्या धडावर असलेलं तुझं डोकं वापरून या सगळ्यावर विचार कर. वाचन कर. पुन्हा विचार कर. तुला आसपास फक्त 'माणूस' दिसेपर्यन्त विचार करत रहा ! तू भाग्यवान आहेस की तू अशा क्षेत्रात करीयर करतीयेस जिथं एकाचवेळी अनेक जात, धर्म, वंश, रंग, प्रांत, देशांची अनेक माणसं रोज एकत्र प्रवास करतात !! तुला रोज जाणवेल की या जगात जर कुठला धर्म असेल तर तो आहे 'मानवता'. बाकी सब झूठ. मग तू हेच विचार तुझ्या पुढच्या पिढ्यांमध्ये मुरव. तुझ्या आधीच्या पिढीतल्या अविवेकी माणसांनी पसरवलेल्या द्वेषाच्या कॅन्सरवर मात करायची हीच थेरपी आहे पोरी...”

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com