Ek Phool Song: एक फूल वाहतो सखे, जवा तुला पाहतो सखे; 'टीडीएम' मधील रोमँटिक गाणं चर्चेत

नुकतंच चित्रपटातील 'एक फुल' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून गाण्याने प्रेमीयुगुलांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे.
Ek Phool Song
Ek Phool Song Saam Tv
Published On

Ek Phool Song: आजवर असे अनेक चित्रपट आहेत जे चित्रपटाच्या कथेसह चित्रपटातील गाण्यामुळे चर्चेत राहिलेत. अशातच भर घालत एक आगळावेगळा विषय घेऊन 'टीडीएम' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाची खासियत म्हणजे चित्रपटातील गाणी. नुकतंच चित्रपटातील 'एक फुल' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून प्रेमीयुगुलांच्या काळजाचा ठोका चुकवत आहे.

Ek Phool Song
Sidharth-Kiara Wedding: कसे असणार सिद्धार्थ-कियाराचे वैवाहिक जीवन; 2 वर्षांनी दिसणार 'हे' चित्र

'व्हॅलेंटाईन डे'चे औचित्य साधत 'टीडीएम' चित्रपटातील 'एक फुल' हे गाणं प्रेक्षकांसमोर आलं असून या रोमँटिक गाण्याच्या संगीताची जबाबदारी संगीतकार रोहित नागभिडे यांनी पेलवली आहे. तर गाण्याच्या ओळी डॉ. विनायक पवार यांनी शब्दबद्ध केल्या आहेत. आणि प्रसिद्ध पार्श्वगायिका प्रियंका बर्वे आणि ओमकारस्वरूप बागडे यांनी त्यांच्या सुमधुर आवाजाने गाण्याला चारचाँद लावले आहेत.

Ek Phool Song
Vaalavi 2: ‘वाळवी’ला मिळालेल्या घवघवीत यशानंतर सिक्वेलची घोषणा, सक्सेस पार्टीत पुढच्या भागाची चर्चा

'टीडीएम' चित्रपटातील नवोदित जोडगोळी अभिनेता पृथ्वीराज आणि अभिनेत्री कालिंदी हे या गाण्यावर थिरकलेले पाहायला मिळत आहेत. आता 'एक फुल' या गाण्याने रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतल्यानंतर साऱ्यांच्या नजरा चित्रपटातील इतर गाण्यांकडे वळल्या आहेत. मात्र त्यासाठी काही क्षणाचा विलंब लागणार आहे. लवकरात लवकर चित्रपटातील इतर गाणी ही ठेका धरायला लावण्यास सज्ज होणार आहेत, यांत शंकाच नाही.

Ek Phool Song
Kiara Adwani Look: कियाराच्या कपड्यांची नाही तर साध्या स्कार्फची झाली चर्चा, एवढं काय आहे 'त्या' स्कार्फमध्ये?

'चित्राक्ष फिल्म्स' आणि ' स्माईल स्टोन स्टुडिओ' प्रस्तुत 'टीडीएम' चित्रपटाच्या निर्मितीची आणि दिग्दर्शनाची धुरा भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी पेलवली आहे. 'ख्वाडा' आणि 'बबन' चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर एक आगळावेगळा विषय ते या चित्रपटातून मांडणार आहेत.

'ख्वाडा' आणि 'बबन' चित्रपटातील गाणी तर आजही लोकांना भुरळ पाडतायत यातच आता भर घालत 'टीडीएम' चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतील यांत शंका नाही. २८ एप्रिल २०२३ ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com