Tarini Marathi Serial: अखेर तारिणीने केदारसमोर देणार प्रेमाची कबूल; पण पुढच्याच क्षणी घडणार मोठा अनर्थ

Tarini Marathi Serial: ‘तारिणी’ मालिकेत भावनिक आणि थरारक वळण आले आहे. केदारवरील प्रेम व्यक्त करताना तारिणीला गोळी लागते. नवीन प्रोमो पाहून चाहते भावुक झाले आहेत.
Tarini Marathi Serial
Tarini Marathi SerialSaam Tv
Published On

Tarini Marathi Serial: झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘तारिणी’मध्ये आता प्रेक्षकांना भावनिक आणि थरारक घडामोडी पाहायला मिळणार आहेत. अनेक दिवसांपासून प्रेक्षक ज्याची वाट पाहत होते, तो क्षण अखेर जवळ आला आहे. तारिणीला केदारबद्दलच्या आपल्या भावना उमगल्या असून ती त्याच्यावरील प्रेम व्यक्त करण्याच्या तयारीत आहे. मात्र, याच क्षणी तिच्या आयुष्यात मोठं संकट येणार असल्याचं मालिकेच्या नव्या प्रोमोमधून समोर आलं आहे.

मालिकेच्या कथेनुसार, तारिणी आणि केदार यांचे लग्न एका मिशनचा भाग म्हणून झाले होते. पण कालांतराने केदारच्या मनात तारिणीबद्दल खरं प्रेम निर्माण झालं. तो तिची प्रत्येक गोष्ट समजून घेतो, तिच्या कुटुंबाचा आदर करतो आणि प्रत्येक संकटात तिच्या पाठीशी उभा राहतो. याच गुणांमुळे तारिणीच्या मनातही केदारसाठी खास जागा निर्माण झाली आहे.

Tarini Marathi Serial
Riteish-Raja Shivaji Collection: रितेश भाऊंच्या 'राजा शिवाजी'ची रेकॉर्ड ब्रेक कमाई; २७ व्या दिवशीही केलं छप्परफाड कलेक्शन

दरम्यान, टीम तारिणी एका मोठ्या मिशनवर काम करत असते. रेवा, युवराजकडून माहिती मिळवून रेव्ह पार्टीच्या ठिकाणाचा शोध लावते. या पार्टीमागे मानवी अवयव तस्करी रॅकेटचा सूत्रधार गुलाब असल्याचे समोर येते. त्यामुळे तारिणीची टीम गुलाबला रंगेहात पकडण्यासाठी सापळा रचते. मात्र, मिशनदरम्यान परिस्थिती अचानक बिघडते. गुलाबची माणसं गोळीबार सुरू करतात आणि मोठी चकमक घडते. या गोंधळात केदार सतत तारिणीचे रक्षण करत असल्याचं तिला जाणवतं. तिच्यावर येणारे प्रत्येक संकट तो स्वतःवर घेत असल्याचं पाहून तारिणी अधिक भावूक होते. इतक्यात गुलाब केदारवर बंदूक रोखतो. केदारचा जीव वाचवण्यासाठी तारिणी क्षणाचाही विचार न करता त्याच्या समोर येते आणि गोळी स्वतःच्या अंगावर झेलते.

Tarini Marathi Serial
Tumbadche Manjula: संकटाच्या क्षणी सई ताम्हणकर घालणार देवाला साद; 'तुंबाडची मंजुळा'मधील 'देवा मला पाव की रे' गाणं प्रदर्शित

गोळी लागल्यानंतर केदार पूर्णपणे हादरून जातो. तो पहिल्यांदाच तिला ‘बॉस’ ऐवजी ‘तारिणी’ म्हणून हाक मारतो. याच वेळी तारिणी त्याच्याकडे पाहत “आय लव्ह...” म्हणण्याचा प्रयत्न करते, पण त्याआधीच ती बेशुद्ध पडते. हा प्रसंग पाहून केदारच्या डोळ्यांत अश्रू येतात. या भावनिक आणि थरारक प्रोमोने सोशल मीडियावर चाहत्यांची मने जिंकली आहेत. “आतापर्यंतचा सर्वोत्तम प्रोमो”, “तारिणी आणि केदारची केमिस्ट्री अप्रतिम आहे” अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून दिल्या जात आहेत. आता तारिणी वाचणार का? आणि गुलाब पोलिसांच्या तावडीत सापडणार का? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com