Tarak Mehta : 'तारक मेहता' मधील सोनू झाली नवरी, शाही थाटात पार पडलं लग्न, कोण आहे नवरा?

Taarak Mehta ka Ooltah Chashmah fame Jheel Mehta got Married : झील मेहताने लग्न सोहळ्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यावर चाहत्यांसह नेटकऱ्यांनी या कपलला वैवाहिक जीवनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
Entertainment News
Tarak MehtaSaam Tv
Published On

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील सोनू हे पात्र साकारणारी अभिनेत्री झील मेहता नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. २८ डिसेंबर रोजी झील मेहताने थाटामाटात बॉयफ्रेंड कंटेन्ट क्रिएटर आदित्य दुबेशी लग्न केले आहे. सोशल मीडियावर झील मेहताने लग्न सोहळ्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यावर चाहत्यांसह नेटकऱ्यांनी या कपलला वैवाहिक जीवनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

Entertainment News
Shashank Ketkar : शशांक केतकरनं नवीन वर्षात दिली गुडन्यूज, सोशल मिडिया पोस्टनं वेधलं लक्ष

झील मेहताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, दोघेही लग्नाच्या गेटअपमध्ये दिसत आहे. झीलने लाल रंगाचा डायमंडने भरलेला लेहेंगा चोली परिधान केला आहे. तर आदित्यने ऑफ व्हाईट रंगाची शेरवानी घातली आहे. दोघांचाही लग्नसोहळ्यातील हा खास अंदाज आकर्षित करत आहे.

सोशल मिडिया पोस्टमध्ये झील म्हणतेय, या आधी मी कधीच इतकी खूश नव्हते. माझ्या आनंदाला पारावर उरला नाही असं ती म्हणतेय. तर पुढे आदित्य म्हणाला जेव्हा झील ही नवरी लूकमध्ये माझ्यासमोर चालत आली तेव्हा मला असं वाटलं की जणू १४ वर्षाच्या आमच्या रिलेशनशीपमध्ये मी १० वर्षे मागे गेलोय" अशातच झील आणि आदित्यचा आनंद गगनास मावेनासा झाला आहे.

झील ही प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेतून कमालीची लोकप्रियता मिळवली. झीलने या मालिकेत सोनू भिडे हे पात्र साकारले होते. २०१२ पर्यंत झीलने मालिकेत काम केले यानंतर तिने वैयक्तिक कारणाने मालिका सोडली. मालिकेत आत्माराम भिडे यांची मुलगी सोनू याच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून प्रेम मिळाले. आजही झील तारक मेहता मधील सोनू या नावाने प्रसिद्ध आहे.

झील मेहता सध्या काय करते?

  झील मेहता ही एक मेकअप आर्टिस्ट आहे. झील तिच्या आईसोबत या प्रोफेशनमध्ये आहे. तिची आई हेअर स्टायलिस्ट आहे. झील सतत सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करताना दिसते. स्टायलिश अंदाजातील विविध व्हिडीओ झील शेअर करते जे तिच्या चाहत्यांना देखील आवडतात.

Entertainment News
Karan Johar : मिशन ₹ 5000 कोटी! पुष्पा २, RRR ला सुद्धा मागे टाकणार; करण जोहरचा जबरदस्त प्लान?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com