Tamannaah Bhatia: तमन्ना भाटिया महाकुंभमेळ्यात सहभागी; त्रिवेणी संगमात स्नान आणि मग चित्रपटाचा टिझर लॉन्च, VIDEO व्हायरल

Tamannaah Bhatia In Maha Kumbh : तमन्ना भाटिया आज शनिवारी प्रयागराजमधील महाकुंभात स्नान केले. तसेच आगामी 'ओडेला २' या चित्रपटाचा टीझर देखील रिलीज केला आहे.
Tamannaah Bhatia In Maha Kumbh
Tamannaah Bhatia In Maha KumbhSaam Tv
Published On

Tamannaah Bhatia In Maha Kumbh: स्त्री २ अभिनेत्री तमन्ना भाटियाने आज शनिवारी प्रयागराजमधील महाकुंभात स्नान केले. यावेळी तिने येथे मनोभावे पूजा देखील केली. तसेच महाकुंभ मेळ्यात तिचा आगामी 'ओडेला २' चा टीझर देखील प्रदर्शित केला. तमन्ना तिच्या चित्रपटाच्या टीमसह महाकुंभ मेळ्यात सहभागी झाली होती. यावेळी तमन्ना अगदी सध्या वेशात होती.

तमन्नाने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली

तमन्ना भाटियाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे आणि 'ओडेला २' च्या टीझरच्या रिलीजची माहिती दिली आहे.तिने लिहिले, 'जेव्हा सैतान परत येतो, तेव्हा दैवी शक्ती त्याच्या भूमीचे आणि त्याच्या वारशाचे रक्षण करण्यासाठी पुढे येते'. हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये दाखल होईल असेही लिहिले आहे. तथापि, रिलीजची तारीख नमूद केलेली नाही.

Tamannaah Bhatia In Maha Kumbh
Chhaava Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर 'छावा'ची गर्जना; पण, अर्जुन कपूरच्या पदरी यावेळी ही निराशाच

'ओडेला २' हा चित्रपट २०२१ मध्ये आलेल्या 'ओडेला रेल्वे स्टेशन' या चित्रपटाचा बहुप्रतिक्षित सिक्वेल आहे. अशोक तेजा दिग्दर्शित या चित्रपटाचा टीझर आज प्रदर्शित झाल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. यामध्ये तमन्ना एका नागा साधूची भूमिका साकारत आहे. डिसेंबर २०२४ मध्ये, तमन्नाच्या वाढदिवसानिमित्त, या चित्रपटातील तिचा लूक समोर आला. आता टीझर प्रदर्शित झाला आहे.

Tamannaah Bhatia In Maha Kumbh
Ankita Walawalkar : नजर काढली, औक्षण केलं, सासरी दणक्यात स्वागत...; अंकिताने घेतला कुणालरावासाठी खास उखाणा, VIDEO

चित्रपटाची कथा काय आहे?

या चित्रपटाची कथा एका गावाभोवती केंद्रित आहे. या गावाचे खरे रक्षक ओडेला मल्लन्ना स्वामी नेहमीच त्यांच्या गावाचे वाईट शक्तींपासून रक्षण करतात. या चित्रपटाचे संगीत अजनीश लोकनाथ यांनी दिले आहे, जे 'कंतारा' या चित्रपटातील त्यांच्या कामासाठी प्रसिद्ध आहेत. या चित्रपटाचे छायाचित्रण सौंदर्यराजन एस करत आहेत. कला दिग्दर्शन राजीव नायर यांच्याकडे आहे. या चित्रपटासाठी तमन्नाने खूप प्रशिक्षण घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com