‘Taare Zameen Par’ बद्दल आमिर खाननं सांगितलेला किस्सा एकदा वाचा; ते रडले होते अन् स्वतःही झाला होता भावुक

Taare Zameen Par : शिक्षक दिनानिमित्त 'तारे जमीन पर' या गुरू शिष्यावर आधारित चित्रपटाविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊयात. हा चित्रपट पाहताना प्रत्येकाला अश्रू अनावर होतात.
Taare Zameen Par
Teachers Day SpecialSAAM TV
Published On

दरवर्षी ५ सप्टेंबर ‘शिक्षक दिन’ ( Teachers Day ) म्हणून साजरा केला जातो. हा दिवस शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याच्या प्रेमाचा दिवस असतो. एक चांगला विद्यार्थी घडवण्याचे काम एक शिक्षक करतो. शिक्षक हा मुलांमधील कलागुण ओळखून त्यांना योग्य दिशा दाखवून मुलांचे आयुष्य मार्गी लावतो. समाजाला एक चांगला नागरिक मिळवून देण्याचे काम शिक्षक करतो. लहानपणी आपल्या आईवडिलांसोबत आपला शिक्षक किंवा गुरू आपल्यावर संस्कार करत असतात. आपल्याला यशाचे मार्ग दाखवत असतात.

शिक्षक दिनानिमित्त एक गुरु-शिष्याचं नातं पाहूया. तुम्ही अनेक गुरु-शिष्याच्या गोष्टी ऐकल्या असतील, पाहिल्या असतील किंवा अनुभवल्या असतील. उदा. द्रोणाचार्य-अर्जुन. मात्र प्रत्येक गुरु-शिष्याचं नातं वेगळं आणि खूप खास असतं. अशीच एक खास कथा तुम्ही सर्वांनी खूप वर्षांपूर्वी पाहिली असेल, ती म्हणजे शिष्य इशान आणि त्याचा गुरु रामशंकर निकुंभ यांची. ही गुरु-शिष्याची जोडी 'तारे जमीन पर' या हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

17 वर्षांपूर्वी बॉलिवूड स्टार आमिर खानचा सुपरहिट चित्रपट 'तारे जमीन पर' (Taare Zameen Par) रिलीज झाला. या चित्रपटातून गुरु-शिष्याचे नाते खूप सुंदर पद्धतीने मांडले आहे. खरा गुरु कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा चित्रपट होय. हा चित्रपट अत्यंत भावूक करणारा आहे. या चित्रपटाने अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आणले आहेत. हा चित्रपट 21 डिसेंबर 2007 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा एवरग्रीन सिनेमा सिनेमा आजही लोकांच्या आठवणीत आहे. तसेच या चित्रपटांनी अनेक मुलांचे आयुष्य बदलले आहे. या चित्रपटाची कथा डायरेक्ट प्रेक्षकांच्या काळजाला भिडली. या चित्रपटात इशानच्या भूमिकेत दर्शील सफारी तर गुरु रामशंकर निकुंभ यांच्या भूमिकेत आमिर खान दिसला आहे. या चित्रपटाने भारतीय प्रेक्षकांसोबत परदेशातील प्रेक्षकांना ही भावूक केले.

'तारे जमीन पर' चित्रपटाची कथा

'तारे जमीन पर' हा चित्रपट खूप गाजला होतो. या चित्रपटात दर्शील सफारीने (Darsheel Safary) इशान नावाच्या मुलाची भूमिका साकारली होती, ज्याला डिस्लेक्सिया (Dyslexia) नावाचा आजार असतो. या आजारात मेंदूवर परिणाम होतो आणि विशेषता वाचन करण्यात आणि लिहिण्यात अडचणी येतात. चित्रपटाच्या कथेनुसार, तो अभ्यास चांगला नसतो. त्याची मोठ्या भावासोबत नेहमी तुलना केली जात असे.

तसेच या चित्रपटात वडिलांचे प्रेम त्याला मिळत नाही. त्याच्या अशा परिस्थितीत जेव्हा त्याचे कुटुंब साथ सोडते तेव्हा त्याला शाळेत एक कला शिक्षकाच्या रुपात रामशंकर निकुंभ सापडतो. म्हणजे अमीर खान ( Aamir Khan) भेटतो. त्याला इशानच्या डिस्लेक्सिया या आजाराबद्दल समजते. अमीर खान त्याला या आजाराशी लढायला ताकद देतो. त्यांच्यातील कला गुण ओळखण्यास मदत करतो आणि एक चांगला चित्रकार बनवतो. या चित्रपटांनी मुल आणि शिक्षकांसोबतच अनेक पालकांचेही समज -गैरसमज मोडून काढले आहे. पालकांनी मुलांना समजून घेण्यास मदत केली आहे. प्रत्येक मुलं हे वेगळ असतं, त्यामुळे त्यांची तुलना करणे टाळा. चित्रपट पाहतांना अनेकांना थिएटरमध्येच अश्रू अनावर झाले.

Taare Zameen Par
Malyalam Actor Nivin Pauly Booked For Rape : मल्याळी अभिनेता निविन पॉलीवर लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल

परदेशी प्रेक्षकांनाही अश्रू अनावर

आज आपण या चित्रपटाच्या संबंधित एक किस्सा जाणून घेणार आहोत. यात भारतीय प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या 'तारे जमीन पर'या चित्रपटाने परदेशातही आपली छाप उमटवली होती. आंतरराष्ट्रीय डिस्लेक्सिया असोसिएशन (IDA) ने 29 ऑक्टोबर 2009 रोजी वॉशिंग्टनमध्ये ‘तारे जमीन पर’ हा चित्रपट दाखवण्यात आला. आमिर खानने एका मीडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, यावेळी प्रेक्षकांमध्ये सुमारे 200 विदेशी प्रेक्षक होते. आम्हाला त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायच्या होत्या. हा चित्रपट सिनेमागृहाऐवजी एका रुममध्ये दाखवण्यात आला होता. मात्र लोकांचा प्रतिसाद पाहून अमीर खान भारावून गेला. ‘तारे जमीन पर’ बघून लोक बाहेर येताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहताना दिसले. परदेशी लोकांच्या हृदयावर देखील या चित्रपटाने आपली छाप उमटवली.

अनेक पुरस्कारांनी सन्मानित

'तारे जमीन पर' या चित्रपटात अमोल गुप्तेसोबत आमिर खानने देखील दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाला फिल्मफेअरच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटासह अनेक पुरस्कार मिळाले. 2007 मधील सर्वाधिक कमाई करणारा 'तारे जमीन पर' 5वा चित्रपट ठरला. तसेच त्यांनी बॉक्स ऑफिसवर देखील ब्लॉकबस्टर कामगिरी केली. मीडिया रिपोर्टनुसार, हा चित्रपट 12 कोटीमध्ये बनला असून चित्रपटाने जगभरात 131 कोटींची कमाई केली होती.

Taare Zameen Par
Sonakshi Sinha : सोनाक्षीने नवऱ्यासोबत एन्जॉय केली स्लिंगशॉट राइड,व्हिडीओ पोस्ट करत लिहिले...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com