Gurucharan Singh: 'मी निघून जाण्याचा निर्णय...' तारक मेहता फेम गुरुचरण सिंगने बेपत्ता होण्याबद्दल सोडलं मौन

Gurucharan Singh Talk About His Disapearance: तारक मेहता का उल्टा चश्मा फेम अभिनेता गुरुचरण सिंग काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाला होता. त्यानंतर २६ दिवसांनी तो सापडला असून त्यांने तो बेपत्ता का झाला होता? यावर मौन सोडले आहे.
Gurucharan Singh
Gurucharan SinghSaam Tv

तारक मेहता का उल्टा चश्मा फेम अभिनेता गुरुचरण सिंग सध्या चर्चेत आहे. गुरुचरण सिंग काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाला होता. त्यानंतर आता जवळपास २६ दिवसांनी तो घरी परत आला आहे. घरी परतल्यावर गुरुचरण सिंग कुठे होता?तो अचानक घर सोडून का निघून गेला? त्याच्या वडिलांना त्याच्याबद्दल काही माहित नव्हतं का? त्याची तब्येत बरी आहे ना? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले होते. त्यावर आता गुरुचरण सिंगने मौन सोडले आहे.

गुरुचरण सिंगने नुकतीच टाईम्स नाऊला मुलाखत दिली आहे. या मुलाखत त्याला तो बेपत्ता असण्यावरुन अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यावर तो म्हणाला की, 'मी त्याबद्दल बोलण्यास अजून तयार नाही आहे. मला काही गोष्टी पूर्ण करायच्या आहेत. मी का बेपत्ता झालो होतो, मला कोणी भाग पाडलं होतं हे मी लवकरच सांगेन. मी सध्या काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत आहे, त्यामुळे आताच काही सांगू शकणार नाही'.

गुरुचरण सिंगने सांगितले की, 'माझ्या काही प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. पण आता मला माझ्या वडिलांसंबधित काही फॉरमॅलिटी पूर्ण करायच्या आहे. त्या कायदेशीर आहेत. सध्या निवडणुका सुरु असल्याने या प्रक्रियेला वेळ लागत आहे'.

गुरुचरण बेपत्ता असताना त्याची तब्येत ठिक नसल्याचे सांगण्यात येत होते. त्याबद्दल त्याला प्रश्न विचारण्यात आले होते. 'माझी तब्येत आता ठिक आहे. काही दिवसांपूर्वी मला खूप डोकेदुखी होती. मात्र, आता सर्व ठिक आहे. मी निघून जाण्याचा निर्णय का घेतला याबद्दलदेखील मी लवकरच सांगेन', असं त्याने सांगितले.

Gurucharan Singh
Chhaya Kadam: 'तुम्ही अंगणात असल्यासारख्या नाचत होत्या...'; छाया कदमकडून ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर, म्हणाली...

गुरुचरण सिंग हा २२ एप्रिलला बेपत्ता झाला होता. तब्बल २६ दिवसांनी म्हणजेच १८ मे रोजी गुरुचरण सिंग सापडला होता. मी एका धार्मिक यात्रेवर गेलो होतो, असं गुरुचरण सिंगने परतल्यावर सांगितले होते.

Gurucharan Singh
Zaira Wasim: 'मी वडिलांना गमावलंय...;'दंगल' फेम अभिनेत्री झायरा वसीमला पितृशोक; इन्स्टाग्रावर शेअर केली भावुक पोस्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com