Bigg Boss Marathi: 'बिग बॉस मराठी'च्या घरात सूरजला मिळणार सुखद धक्का, आत्या अन् बहिणींना पाहताच पाणावले डोळे; VIDEO

Suraj Chavan: आज बिग बॉस मराठीच्या घरात सुरज चव्हाण याची आत्या आणि बहीण येणार आहे.
'बिग बॉस मराठी'च्या घरात सूरजला मिळणार सुखद धक्का, आत्या अन् बहिणींना पाहताच पाणावले डोळे; VIDEO
Suraj ChavanSaam Tv
Published On

'बिग बॉस मराठी'च्या घरातील लक्षवेधी चेहरा म्हणजे सूरज चव्हाण. सूरजने आपल्या स्टाईलने प्रेक्षकांना चांगलच खिळवून ठेवलं आहे. त्याची प्रत्येक गोष्ट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असते. आजच्या भागातही तो प्रेक्षकांना रडवताना दिसून येईल. त्यामुळे सूरजसह प्रेक्षकदेखील भावूक झालेले आजच्या भागात पाहायला मिळतील.

'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi) नवा प्रोमो सर्वांचच लक्ष वेधून घेत आहे. प्रोमोमध्ये, 'बिग बॉस' म्हणत आहेत,"सूरज स्वागत करुयात आपल्या बहिणींचं आणि आत्यांचं".

'बिग बॉस मराठी'च्या घरात सूरजला मिळणार सुखद धक्का, आत्या अन् बहिणींना पाहताच पाणावले डोळे; VIDEO
Bigg Boss Marathi: 'बिग बॉस'ने घेतली अभिजीत अन् निक्कीची फिरकी

सूरजच्या बहिणी आणि आत्या त्याला म्हणत आहेत,"तुझ्यामुळे आज आम्हाला इथपर्यंत यायला मिळालं आहे. सूरजला 'बिग बॉस मराठी'च्या आलिशान घरात पाहून त्याच्या बहिणींना आणि आत्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

डीपीने निक्कीची मागितली माफी

डीपी दादा निक्कीला वेगळ्या नावाने हाक मारत असल्याचं तिला पटत नाही आहे. त्याबद्दल तिने डीपी दादांनादेखील सांगितलं. निक्की म्हणतेय,"लोक मला त्या माझ्या नावाने ओळखतात".

'बिग बॉस मराठी'च्या घरात सूरजला मिळणार सुखद धक्का, आत्या अन् बहिणींना पाहताच पाणावले डोळे; VIDEO
Bigg Boss Marathi: "त्याने जे केलं ते चुकीचं..." निक्कीच्या आईच्या 'त्या' वक्तव्यावर अरबाज पटेलची पहिली प्रतिक्रिया

डीपी दादा पुढे निक्कीची माफी मागतात. डीपी दादा म्हणतात,"माझं हे इंटेशन नव्हतं. मी मनापासून तुझी माफी मागतो. मोठा भाऊ समजून मला माफ कर". निक्की पुढे डीपी दादांना काळजी घेण्याचा सल्ला देते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com