Sunny Sanskari Ki Tulsi Kumari: 'याची गर्लफ्रेंड त्याची बायको...'; वरुण- जान्हवीच्या लव्हस्टोरीमध्ये कॉमेडीचा तडका

Sunny Sanskari Ki Tulsi Kumari Trailer: जान्हवी कपूर आणि वरुण धवन यांच्या 'सनी संस्कार की तुलसी कुमारी' या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाactorला आहे. या चित्रपटात सान्या मल्होत्रा ​​आणि रोहित देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
Sunny Sanskari Ki Tulsi Kumari Trailer
Sunny Sanskari Ki Tulsi Kumari TrailerSaam Tv
Published On

Sunny Sanskari Ki Tulsi Kumari Trailer: वरुण धवन, जान्हवी कपूर, सान्या मल्होत्रा ​​आणि रोहित सराफ स्टारर 'सनी संस्कार की तुलसी कुमारी' हा चित्रपट गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे जो डबल लव्हस्टोरी आधारित आहे. सनी संस्कारी अनन्याच्या प्रेमात आहे, पण अनन्याचे लग्न विक्रमशी होत आहे. पण, तुलसी कुमारी विक्रमवर प्रेम करते. एक भव्य लग्न आणि त्याचे कार्यक्रमात सनी आणि तुलसी त्यांच्या एक्सना जळवण्यासाठी येतात. आणि सुरु होते धमाल लव्ह कॉमेडी स्टोरी.

दुहेरी कथेवर आधारित

जवळजवळ तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये बरीच नाट्यमयता आहे. चार पात्रांभोवती विणलेली ही कथा यापूर्वी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये पाहिली गेली आहे. जर तुम्ही अजय देवगण आणि काजोलचा 'प्यार तो होना ही था' हा चित्रपट पाहिला असेल, तर 'सनी संस्कार की तुलसी कुमारी'चा हा ट्रेलरही सारखाच दिसतो. 'बावल' चित्रपटात वरुण आणि जान्हवीला एकत्र पाहिल्यानंतर, या नवीन चित्रपटात त्यांना पाहणे मजेदार असेल.

Sunny Sanskari Ki Tulsi Kumari Trailer
Karan Johar: ऐश्वर्यानंतर करण जोहरची कोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय आहे ?

ट्रेलर रिलीज होताचं ट्रेलरखाली चाहत्यांच्या गमतीशीर कमेंट येत आहेत. एका चाहत्याने लिहिले की, "'मोहब्बत पे नहीं है किसी का कबू.... पाक चिक पक राजा बाबू' हे खूप मस्त होतं" तर दुसऱ्याने लिहिले, वरूणचा हा कॉमिक टाईमिंग मस्त आहे. आणखी एकाने म्हटले आहे की, "हा कॉमिक टाईमिंग त्यात वरुण जान्हवी रोहित सान्या मनोरंजन फूल पॅकेज."

Sunny Sanskari Ki Tulsi Kumari Trailer
Vicky Jain: 'कपड्यांवर अन् वॉशरूममध्ये रक्त...; अंकिताच्या नवऱ्याने स्वत: सांगितला कसा झाला अपघात

या दिवशी प्रदर्शित होत आहे

धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनलेला हा चित्रपट पुढील महिन्याच्या २ तारखेला म्हणजेच गांधी जयंतीला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खैतान यांनी केल असून यामध्ये वरुण धवन, जान्हवी कपूर, सान्या मल्होत्रा ​​आणि रोहित सराफ यांच्यासह अभिनव शर्मा, मनीष पॉल, अक्षय ओबेरॉय आदी कलाकार देखील महत्वपूर्ण भूमिकेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com