Sunny Deol: लाजा वाटत नाहीत का? घरापर्यंत आलेल्या पॅप्सला सनी देओलने घातल्या शिव्या

Sunny Deol Viral Video: हिंदी चित्रपटसृष्टीतील 'ही-मॅन' धर्मेंद्र यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. दरम्यान, सनी देओलचा एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये सनी पापाराझींवर रागवताना दिसत आहे.
Sunny Deol
Sunny DeolSaam Tv
Published On

Sunny Deol: गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडचे 'ही-मॅन' धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावर चर्चा रंगल्या आहेत. गेल्या सोमवारी धर्मेंद्र यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत विविध दावे केले जात आहेत. कुटुंबाने मीडियाला गोपनीयतेची विनंती केली. तथापि, त्यानंतरही धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबतच्या बातम्या सोशल मीडियावर फिरत राहिल्या. तसेच त्यांच्या निधनाच्या बातम्याही समोर आल्या. आता सनी देओलने या कृत्याबद्दल पापाराझींवर राग व्यक्त केला आहे.

सनी देओल यांचा पापाराझींवर राग

सोशल मीडियावर सनी देओलचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ त्याच्या घराबाहेरचा आहे. सनी देओल त्याच्या घराबाहेर असलेल्या पापाराझींना पाहताच त्याचा राग अनावर झाला आणि रागात सनी देओल म्हणला, "तुम्हाला लाज वाटली पाहिजे... तुमच्या घरात आई-वडील आणि मुलं नाहीत का?... तुम्ही 'चू***' असे व्हिडिओ बनवत आहात. तुम्हाला लाज वाटत नाही का?"

Sunny Deol
Rashmika-Vijay: 'प्रत्येकाच्या आयुष्यात विजय असावा...'; लग्नाच्या चर्चांमध्ये विजयने केलं रश्मिकाला किस, पाहा व्हायरल VIDEO

सोशल मीडिया नेटकरी काय म्हटले

सनी देओलच्या या व्हिडिओवर सोशल मीडिया नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले, "सनी देओलने बरोबर काम केले." दुसऱ्या एका युजरने लिहिले, "सनी देओलचा राग योग्य आहे." आणखी एका युजरने लिहिले, "साहेब, त्यांना माझ्याकडून आणखी दोन शिव्या द्या." दुसऱ्या एका युजरने लिहिले, "पाजी अगदी बरोबर आहे." दुसऱ्या एका युजरने लिहिले, "त्यांना एकटे सोडा, त्यांचे वडील बरे नाहीत."

Sunny Deol
Kajol: लग्नाचीही एक्सपायरी डेट असली पाहिजे...; काजोलच्या वक्तव्यावर नेटकरी चिडले; म्हणाले, त्याला घटस्फोट...

१० नोव्हेंबर रोजी धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल केले. तर, १३ नोव्हेंबर रोजी डिस्चार्ज देण्यात आला आणि घरी आणण्यात आले. कुटुंबाकडून अधिकृत निवेदनात म्हटले आहे की धर्मेंद्र यांची घरीच काळजी घेतली जाईल. कुटुंबाने माध्यमांना आणि जनतेला त्यांना प्रायव्हसी देण्याची विनंती केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com