Lock Upp 2: 'लॉक अप २'मधून सुनीता आहुजाची एक्झिट; पत्नीला घेण्यासाठी सेटवर पोहोचला गोविंदा

Lock Upp 2: 'लॉक अप'मधून प्रकृती अस्वास्थ्यामुळे सुनीता आहुजा बाहेर पडल्या. गोविंदा स्वतः त्यांना घेण्यासाठी सेटवर पोहोचले. दोघांनी वैवाहिक आयुष्य, कुटुंब आणि अफेअर्सच्या चर्चांवरही प्रतिक्रिया दिली.
Lock Upp 2
Lock Upp 2Saam Tv
Published On

Lock Upp 2: 'लॉक अप' (Lock Upp) या रिअॅलिटी शोच्या 'जजमेंट डे' भागात अनेक धक्कादायक घडामोडी पाहायला मिळाल्या. प्रकृती खालावल्यामुळे गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा यांचा शोमधील प्रवास अखेर संपला. त्यांची प्रकृती लक्षात घेऊन सह-सूत्रसंचालक फराह खान आणि रितेश देशमुख यांनी त्यांना शोमधून बाहेर जाण्याची परवानगी दिली. विशेष म्हणजे, सुनीताला घेण्यासाठी स्वतः अभिनेता गोविंदा सेटवर पोहोचला होता.

शोदरम्यान सुनीता आहुजा भावूक झालेल्या दिसल्या. त्यांनी सांगितले की, मधुमेह नियंत्रणात नसल्याने आणि मेनोपॉज टप्प्यातून जात असल्यामुळे त्यांना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. शरीरात तीव्र वेदना होत असून श्वास घेण्यासही अडचण येत असल्याने त्यांनी वारंवार शो सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती.

Lock Upp 2
Famous Singer Death: भारतीय संगीत विश्वाचा जादुई आवाज हरपला; ज्येष्ठ गायिका काळाच्या पडद्याआड

शोमधून बाहेर आल्यानंतर गोविंदाने सुनीताला मिठी मारत तिची समजूत काढली. यावेळी त्याने हलक्याफुलक्या अंदाजात एक किस्साही सांगितला. "माझ्या मित्रांनी सुनीता शोमध्ये शिव्या देतानाचे अनेक व्हिडिओ मला पाठवले. पण काही हरकत नाही, मी ते सर्व सहन केले आहे," असे म्हणत गोविंदा म्हणाला. त्याचबरोबर सुनीता लहान मुलासारखी असून तिने यापूर्वी अशा कठीण परिस्थितीचा सामना कधीच केला नव्हता, असेही त्याने सांगितले.

Lock Upp 2
Kamali Serial: कमळीच्या आयुष्यात मोठा ट्विस्ट! आई जिवंत असल्याचं सत्य येणार समोर; पण, कामिनी रचणार विषाचा कट

दरम्यान, शोमध्ये सुनीताने कुटुंबाबद्दल केलेल्या वक्तव्यांवरूनही चर्चा रंगली होती. यावर फराह खान यांनी तिला या अनुभवातून काय शिकायला मिळाले, असा प्रश्न विचारला. त्यावेळी गोविंदाने हस्तक्षेप करत, "कुटुंबात जे काही घडले ते घरातच राहू द्या. मी माझ्या जवळच्या लोकांवर कायम प्रेम करत राहीन," असे स्पष्ट केले. काही वेळाने त्यांची मुलगी टीना आहुजाही सेटवर पोहोचली. आईला अशा अवस्थेत पाहून तिलाही अश्रू अनावर झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com