Har Har Mahadev: शिवमणी करणार खास परफॉर्म; कलाकृतीकडे चाहत्यांचे लक्ष

चित्रपटातील लवकरच गाणे ही प्रेक्षकांच्या समोर येणार आहेत. यामुळे सध्या प्रेक्षकांमध्ये खासकरुन शिवभक्तांमध्ये चांगलेच उत्साहाचे वातावरण आहे.
Har Har Mahadev (2022)
Har Har Mahadev (2022) Instagram/@subodhbhave
Published On

मुंबई: झी स्टुडिओजच्या हर हर महादेव (Har Har Mahadev Marathi Movie) चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चित्रपटाबद्दल उत्सुकता चांगलीच शिगेला पोहोचली. वास्तविक लढायांवर आधारित चित्रपटात स्वराज्य मिळवण्यासाठी बहादुर, बलिदान, अतुट धैर्य कहाणी चित्रपटात दाखवण्यात येत आहे. चित्रपटातील शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी प्रवासाला अनुसरुन, मुघल साम्राज्य, विविध सम्राज्यांच्या विरोधात चित्रपटातील बहादुरी चित्रित करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

Har Har Mahadev (2022)
Sukh Mhanje Nakki Kay Asta: जयदीप वाचवेल का गौरी आणि बाळाचे प्राण...पुढे काय घडणार?

चित्रपटातील लवकरच गाणे ही प्रेक्षकांच्या समोर येणार आहेत. यामुळे सध्या प्रेक्षकांमध्ये खासकरुन शिवभक्तांमध्ये चांगलेच उत्साहाचे वातावरण आहे. मराठी चित्रपटसृष्टीत कधी ही न घडलेला संगीत सोहळा प्रेक्षकांना आज सायंकाळी अनुभवता येणार आहे. शिवमणी आज, ३० सप्टेंबरला चित्रपटातील काही गाण्यांतून आपली कला सादर करणार आहे.

आज सायंकाळी मुलुंडमधील कालिदास नाट्यमंदीरात शिवमणीचा लाईव्ह परफॉर्म अनुभवता येणार आहे. त्याच्या संगीताची खुबी ही सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे त्याच्या सादरीकरणाने संगीत प्रेमींसोबतच प्रेक्षकांनाही चित्रपटाची उत्सुकता चांगलीच दिसत आहे.

Har Har Mahadev (2022)
Bollywood News: रणवीर-दीपिकाच्या नात्यात आला 'का रे दुरावा'; एका पोस्टने चर्चेला उधाण !

सुबोध साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका

मराठीतील हरहुन्नरी आणि बहुआयामी अभिनेता अशी ओळख असलेला सुबोध भावे या चित्रपटात छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत झळकणार आहे. छत्रपती शिवरायांच्या कार्याची ख्याती आणि कीर्ती ही केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभर पसरलेली आहे. देशभरातील लोकांसाठी आजही छत्रपती शिवाजी महाराज हे प्रेरणास्रोत आहेत. हीच बाब लक्षात घेऊन या चित्रपटाच्या माध्यमातून महाराजांचे कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे या उद्देशाने हा भव्य दिव्य चित्रपट मराठीसह हिंदी, तमिळ, तेलगु आणि कन्नड भाषेतून प्रदर्शित करण्याचा निर्णय झी स्टुडिओजने घेतलेला आहे. येत्या दिवाळीत पाच भारतीय भाषांमध्ये एकाच दिवशी प्रदर्शित होणारा हा पहिलाच मराठी चित्रपट ठरणार आहे.

Edit By: Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com