मुंबई: अनेक चित्रपटांतून (Marathi Entertainment News) प्रेक्षकांच्या समोर आलेली जोडी खऱ्या आयुष्यातही आपल्या साथीदाराला साथ देत संसार करीत आहेत. बॉलिवूडमध्ये (Bollywood) काही खास जोड्याच यशस्वी जोडी म्हणून चाहते त्यांच्याकडे पाहतात. त्यातील लोकप्रिय जोडी म्हणून रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि दीपिका पदुकोणकडे (Deepika Padukon) पाहिले जाते. या दोघांनीही एकत्र रामलीला, 83, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत चित्रपटांत ऑनस्क्रिन दिसले होते. पण चित्रपटात एकत्र दिसणाऱ्या जोडीत काही आलबेल नसल्याचे कळत आहे.
रणवीर- दीपिका यांच्या नात्यात काही तरी खटके उडाल्याचे कळत आहे. सोशल मीडियावर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चेला उधाण आले आहे. चर्चेला सुरुवात झाली ती एका ट्विटने. रणवीरचा सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत असून व्हिडिओत रणवीर दीपिकाबद्दल बोलत आहे. चित्रपट समिक्षक उमैर संधू यांनी रणवीर आणि दीपिकाच्या नात्यावर ट्विट केले असून ट्विट चांगलेच चर्चेत आले आहे.
नुकतेच दीपिकाला मुंबईतील ब्रिच कॅंडी रुग्णालयात तब्येत ठिक नसल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावर ट्रोलर्सने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तर काहींनी हे पब्लिक स्टंट असल्याचे बोलले आहेत. या दरम्यान रणवीरची प्रतिक्रीया समोर आली आहे.
एका मुलाखतीत रणवीर आपल्या नातेसंबंधावर मनमोकळेपणाने बोलतो, आम्ही २०१२ ला एकत्र भेटलो आणि तेव्हापासून एकमेकांना डेट करतोय. आमच्या नात्याला १० वर्ष पूर्ण होत आहेत. त्याच मुलाखतीत तो नातेसंबंधांवर बोलणे टाळले आहे. दीपिका- रणवीर 'रामलीला'च्या सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले होते. अखेर १४ नोव्हेंबर २०१८ रोजी लग्नबंधनात अडकले. काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतरच लग्नाचा ठाम विचार त्यांनी घेतला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.