Sukh Mhanje Nakki Kay Asta: जयदीप वाचवेल का गौरी आणि बाळाचे प्राण...पुढे काय घडणार?

देवी अंबाबाईला साकडं घालून जयदीप वाचवू शकेल का गौरी आणि बाळाचे प्राण.
Sukh Mhanje Nakki Kay Asta
Sukh Mhanje Nakki Kay AstaSaam TV
Published On

Sukh Mhanje Nakki Kay Asta Episode Update: नवरात्री या सणाला भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे प्रत्येक जण या सणात कसं सहभागी होता येईल यासाठी प्रयत्न करत असतो. त्यात टीव्हीवरील मालिका कशा मागे राहतील. नुकतंच 'सुख म्हणजे नक्की काय असतं!' (Sukh Mhanje Nakki Kay Asata) ची टीम कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाला जाऊन आली आहे. मालिकेतील एका महत्वाचा भाग शूट करण्यासाठी संपूर्ण टीम तिथे गेली होती.

Sukh Mhanje Nakki Kay Asta
Bollywood News: रणवीर-दीपिकाच्या नात्यात आला 'का रे दुरावा'; एका पोस्टने चर्चेला उधाण !

मालिका एका महत्वाच्या वळणावर आली आहे. गौरी आणि जयदीप (Gauri Jaydeep) आई-बाबा होणार आहेत. त्यातच गौरीचा अपघात झाला आहे. गौरी आणि बाळाच्या जीवाला धोका आहे. ते दोघे मृत्यूशी झुंज देत आहेत. गौरीचे आणि बाळाचे प्राण वाचवण्यासाठी जयदीप कोल्हापूरला अंबाबाईला (Ambabai) साकडं घालण्यासाठी गेला आहे.

Sukh Mhanje Nakki Kay Asta
Big Boss Season 4: बिग बॉसच्या चौथ्या पर्वात हॉटनेसचा तडका; व्हिडिओ पाहून चर्चेला उधाण !

जयदीप मंदिरामध्ये साफसफाई करताना, दिवे लावताना दिसत आहे. तसेच जयदीप मंदिरात येणाऱ्या भक्तांच्या चपला सांभाळताना देखील दिसत आहे. हा भाग आपल्याला नवरात्री दरम्यान पाहता येणार आहे.

जयदीप हे पात्र साकारणारा अभिनेता माधवने या विशेष भागासाठी खूप मेहनत केली आहे. माधवने यापूर्वी देखील कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेतले आहे. परंतु त्याची इच्छा होती की मालिकेचा एकतरी भाग या पवित्र जागी चित्रित व्हावा. माधवने सांगितले की, "देवी अंबाबाईच्या आशीर्वादाने माझी ही इच्छा पूर्ण झाली आहे. शूटिंगच्या निमित्ताने मला इथे काम करण्याची संधी मिळाली हे क्षण मी कधीच विसरू शकत नाही. या विशेष भागचे शूटिंग पाहण्यासाठी हजारो प्रेक्षकांनी गर्दी केली होती. प्रेक्षकांचे हे प्रेम मला नवी ऊर्जा देतं."

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com