Yash Birthday: फक्त 300 रुपये घेवून घर सोडलेला पोरगा, ते एका चित्रपटाचे 30 कोटी मानधन, रॉकी भाईचा थक्क करणारा प्रवास

सिनेसृष्टीतील सर्वात लोकप्रिय हिरो असलेल्या यशचे बालपण मात्र अत्यंत हालाखीत गेले. प्रचंड संघर्ष करत त्याने आज यशाचे शिखर गाठले आहे. आज सुपरस्टार यशचा वाढदिवस. पाहा यशचा कंडक्टरचा पोरगा ते सिनेसृष्टीचा सुपरस्टार हा थक्क करणारा संघर्षमय प्रवास.
Yash
YashSaam Tv
Published On

Superstar Yash Birthday: रॉकी भाई म्हणलं की प्रत्येकाच्याच डोळ्यासमोर दाक्षिणात्य सुपरस्टार यशचा डॅशिंग लूक उभा राहतो. केजीएफ चित्रपट आला अन या दाक्षिणात्य सुपरस्टारने (Tollywood) अवघ्या देशाला आपल्या डॅशिंग लूकने वेड लावले. सुपरस्टार यशच्या याच दमदार अभिनयाचे आज देशभरात असंख्य चाहते आहेत.

सिनेसृष्टीतील सर्वात लोकप्रिय हिरो असलेल्या यशचे बालपण मात्र अत्यंत हालाखीत गेले. प्रचंड संघर्ष करत त्याने आज यशाचे शिखर गाठले आहे. आज ( 8, जानेवारी) सुपरस्टार यशचा वाढदिवस. पाहूया यशचा हा संघर्षमय प्रवास.

Yash
Ind Vs SL T20 Series: टीम इंडियाकडून श्रीलंकेचा करेक्ट कार्यक्रम, 'हे' पाच खेळाडू ठरले गेमचेंजर

संघर्षमय बालपण :

रॉकी भाई म्हणजेच यशचा जन्म कर्नाटकातील एका छोट्याशा खेडेगावात झाला. कुमार गौडा हे त्याचे खरे नाव. यशचे वडिल कर्नाटक सरकारच्या बसचे कंडक्टर होते. अगदी यश सुपरस्टार झाल्यानंतरही बराच काळ त्यांनी ही नोकरी केली. यशला मात्र पहिल्यापासून अभिनयात रस होता. लहानपणापासून त्याने अभिनेता व्हायचे स्वप्न बाळगले होते. मात्र यशच्या घरच्यांना त्याचे हे स्वप्न मान्य नव्हते. त्यामुळेच त्याने बारावीमधूनच शिक्षण अर्धवट सोडले.

खिशात अवघे ३०० रुपये घेवून यशने घर सोडत बेंगलोर गाठले. बेंगलोरमध्ये आल्यानंतर त्याने थिएटरमध्ये काम मिळवण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. या काळात मालिका तसेच चित्रपटांसाठी ऑडिशन देता देता त्याने असिस्टंट डायरेक्टर म्हणूनही काम केले.

Yash
Jalgaon News: कामावरून घरी आल्‍यावर मुलीला पाहून आईला बसला धक्‍का

पहिला चित्रपट प्रदर्शित:

अनेक वर्ष संघर्ष केल्यानंतर यशचा २००८ मध्ये पहिला चित्रपट प्रदर्शित झाला. मोगिन्न मनसु या चित्रपटातून त्याने सिने जगतात पाऊल ठेवले. आपल्या पहिल्याच चित्रपटाला त्याला सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला. यानंतर मात्र त्याने मागे वळून पाहिले नाही. एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारत यशने सिने जगतात आपला दरारा निर्माण केला.

करिअरमध्ये यश मिळत असतानाच यशच्या आयुष्यात राधिका पंडीतची एंट्री झाली. यश आणि राधिकाची लवस्टोरीही खुपच फिल्मी आहे. दोघांची एका चित्रपटाच्या सेटवर भेट झाली होती. त्यांनी एकमेकांना चार वर्ष डेट केले. ९ डिसेंबर २०१६ मध्ये दोघेही विवाहबंधनात अडकले.

आज यश हा भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात मोठा सुपरस्टार म्हणून ओळखला जातो. सिनेसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता म्हणूनही त्याचे नाव घेतले जाते. केजीएफ २ साठी यशने तब्बल ३० कोटी इतके मानधन घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com