
दक्षिण कोरियातील प्रसिद्ध अभिनेता सॉन्ग यंग-क्यू यांचं ५५ व्या वर्षी निधन.
योंगिन येथील कारमध्ये मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली.
मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट नाही, पोलिसांची चौकशी सुरू.
१९९४ पासून चित्रपट आणि नाटकांमधून त्यांनी लोकप्रियता मिळवली होती.
दक्षिण कोरियातील प्रसिद्ध अभिनेता सॉन्ग यंग-क्यूचं वयाच्या ५५ व्या वर्षी निधन झालंय. एका कारमध्ये अभिनेत्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडालीय. अभिनेत्याचा मृत्यू कशामुळे झालं याचे कारण अद्याप स्पष्ट आहे. दरम्यान पोलीस संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत.
ग्योंगी प्रांतातील योंगिन येथील एका टाउनहाऊस कॉम्प्लेक्समध्ये अभिनेत्याची कार आढळली होती. त्या कारमध्ये अभिनेत्याचा मृतदेह आढळला होता. त्याच्या मृत्यूच्या बातमीनं चाहत्यांना धक्का बसलाय. सॉन्ग यंग-क्यू हा दक्षिण कोरियाचा प्रसिद्ध अभिनेता होता. त्याने १९९४ मध्ये ड्रामा, विझार्ड म्युरल या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटातून तो लोकप्रिय अभिनेता बनला होता.
'बिग बेट', 'ह्वारंग' आणि 'हॉट स्टोव्ह लीग' यांसह अनेक के-ड्रामामध्ये त्यानं आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. या ड्रामामधील त्याचा अभिनय लोकांच्या पसंतीस पडले होते. ओटीटीवरील अनेक वेब सीरिजमध्येही त्यानं भारदस्त अभिनय केलाय. सॉन्गने लँड ऑफ हॅपीनेस, द डेस्परेट चेस, व्हेअर वूड यू लाइक टू गो?, टॉम ऑफ द रिव्हर,अ फ्रेंच वुमन, टॉक्सिक, एक्सट्रीम जॉब, बेसबॉल गर्ल, व्ही.आय.पी. आणि पॅन्डोरा यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलंय.
दरम्यान काही दिवसांपूर्वी सॉन्ग यंग-क्यूला अटक करण्यात आली होती. सॉन्ग यंग-क्यू त्याच्या शोपेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत होता. काही दिवसांपूर्वी त्याला दारू पिऊन गाडी चालवल्याबद्दल अटक करण्यात आली होती. या घटनेचा अभिनेत्याच्या करिअरवर खूप वाईट परिणाम झाला. त्याला अनेक शोमध्ये काम मिळाले नव्हते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.