Samantha Ruth Prabhu: दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभूने अखेर तिच्या गरोदरपणाच्या चर्चांवर एक खास फोटो शेअर करुन नेटकऱ्यांना गुड न्यूज दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून ती आई होणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगत होत्या. आता समांथाने स्वतः बेबी बंपचा फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. तिच्या या फोटोमुळे सोशल मीडियावर चाहते आणि सेलिब्रिटी शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
सध्या समांथा तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'मा इंती बंगारम' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याचदरम्यान एका मुलाखतीत तिने चाहत्यांना मोठी आनंदाची बातमी दिली. पुन्हा सुट्टीवर जाणार नाही ना या चाहत्याच्या प्रश्नावर उत्तर देताना म्हणाली, मला एक छोटीशी मॅटर्निटी लीव्ह घेण्याची परवानगी द्या त्यानंतर मी सुट्टी घेणार नाही," असे हसत म्हणत तिने आपण गरोदर असल्याचे जाहीर केले. तिच्या या वक्तव्यानंतर चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
आता समांथाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर बेबी बंप फ्लाँट करत एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये ती जिममध्ये व्यायामाच्या साहित्याजवळ उभी असल्याचे दिसते. फोटोसोबत तिने, "माझे सिक्स पॅक मी पुन्हा तुम्हाला भेटेन... जेव्हा मी त्याला भेटेन," असे मजेशीर कॅप्शन दिले. तसेच, "माफ करा मित्रांनो, मला आणखी थोडा ब्रेक घ्यावा लागेल. मला मॅटर्निटी लीव्ह घ्यावी लागेल, पण मी खूप आनंदी आहे," असेही तिने लिहिले.
समांथा आणि चित्रपट निर्माते राज निदिमोरू यांनी २०२५ मध्ये लग्न केले होते. हे दोघांचेही दुसरे लग्न आहे. यापूर्वी समांथाचं अभिनेता नागा चैतन्यसोबत २०१७ मध्ये लग्न झालं होतं. मात्र, २०२१ मध्ये दोघांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. तर राज निदिमोरूचाही यापूर्वी श्यामली डेसोबत विवाह झाला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.