Sonam Kapoor: अभिनेत्री सोनम कपूर ४०व्या वर्षी पुन्हा होणार आई; लवकरच देणार चाहत्यांना खूशखबर...!

Sonam Kapoor: बॉलीवूड अभिनेत्री आणि अनिल कपूरची लाडकी मुलगी सोनम कपूर लवकरच तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. सोनम कपूर आणि तिचा पती आनंद आहुजा लग्नाच्या सात वर्षांनंतर दुसऱ्यांदा आई- बाबा होणार आहेत.
Sonam Kapoor
Sonam KapoorSaam Tv
Published On

Sonam Kapoor: बॉलीवूड अभिनेत्री आणि अनिल कपूरची लाडकी मुलगी सोनम कपूर लवकरच तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. सोनम कपूर आणि तिचा पती आनंद आहुजा लग्नाच्या सात वर्षांनंतर दुसऱ्यांदा आई- बाबा होणार आहेत. कपूर आणि आहुजा कुटुंब आनंदाने भरले आहे. दोन्ही कुटुंबे त्यांच्या लहान पाहुण्याच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सोनमने अद्याप तिच्या गरोदरपणाबद्दल कोणतेही घोषणा केली नसली तरी, ती लवकरच अधिकृत पोस्टद्वारे ही आनंदाची बातमी शेअर करू शकते.

सोनम कपूरने २०२२ मध्ये तिचा पहिला मुलगा वायुला जन्म दिला. पिंकव्हिलाच्या वृत्तानुसार, ती दुसऱ्यांदा गरोदर आहे. सोनम आणि आनंदच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, "सोनम पुन्हा गपोदर आहे आणि दोन्ही कुटुंबे या बातमीने खूप आनंदी आहेत." पण, सोनम किंवा तिच्या कुटुंबाकडून अद्याप कोणतेही अधिकृत माहिती आलेली नाही.

Sonam Kapoor
FIR Against Actress: मोलकरणीचा छळ केला, नंतर नग्न व्हिडिओ शूट करुन...; अभिनेत्रीवर गंभीर आरोप, गुन्हा दाखल

सोनम चित्रपटसृष्टीपासून दूर आहे

सोनम कपूरने ८ मे २०१८ रोजी आनंद आहुजाशी लग्न केले. त्यांनंतर २०२२मध्ये वायू या त्यांच्या मुलाला जन्म दिला. लग्नानंतर सोनमने चित्रपटसृष्टीपासून दूर झाली. पण, त्यानंतर २०२३ मध्ये तिने "ब्लाइंड" चित्रपटात काम केले. सोनम तिचा बहुतेक वेळ लंडनमध्ये घालवते.

Sonam Kapoor
Sahher Bambba: द बॅड्स ऑफ बॉलिवूडमध्ये झळकणारी साहेर बंब्बा नक्की कोण आहे?

तिचे सासरचे लोक दिल्लीत राहतात आणि तिचे मुंबईतही घर आहे. ती चित्रपटांमध्ये काम करत नसली तरी, जाहिराती आणि मॉडेलिंगच्या कामांसाठी ती वारंवार मुंबईला येत असते. ती तिच्या कामाबद्दल आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल इन्स्टाग्रामवर वारंवार पोस्ट करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com