Sky Force Box Office Collection Day 8
Sky Force CollectionSAAM TV

Sky Force Office Collection: 8 दिवसांत इतिहास रचला; १०० कोटीच्या क्लबमध्ये प्रवेश करणारा 'स्काय फोर्स' ठरला पहिला चित्रपट!

Sky Force Box Office Collection: अक्षय अक्षय कुमार आणि वीर पहारिया यांचा स्काय फोर्स बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. हा चित्रपट १०० कोटी रुपयांच्या कमाईकडे सरकत आहे.
Published on

Sky Force Box Office Collection: संदीप केवलानी आणि अभिषेक अनिल कपूर दिग्दर्शित, अक्षय कुमार अभिनीत, स्काय फोर्सने भारतात बॉक्स ऑफिसवर ८ व्या दिवशी २.५६ कोटी रुपयांची कमाई केली. चित्रपटाचा एकूण भारतात ८९.०६ कोटी रुपयांचे कलेक्शन झाले आहे आणि आठवड्याच्या शेवटी हा चित्रपट १०० कोटी रुपयांचा आकडा ओलांडेल अशी अपेक्षा आहे.

आठव्या दिवशी, चित्रपटाचा एकूण हिंदी ऑक्युपन्सी रेट ११.२२% होता. सातव्या दिवसाच्या अखेरीस, स्काय फोर्सने जगभरातील १०० कोटी रुपयांचा आकडा ओलांडला असून या चित्रपटाने १११.५ कोटी रुपयांवर पोहोचला होता.

Sky Force Box Office Collection Day 8
Samantha Ruth Prabhu: समांथा दिसणार पुन्हा अ‍ॅक्शन अवतारात; आशिकी बॉयसोबत रंगणार लव्ह केमेस्ट्री

सातव्या दिवशी चित्रपटाचे भारतात ८६.५ कोटी रुपये कलेक्शन झाले, तर एकूण एकूण कलेक्शन १०३.२५ कोटी रुपये होता. परदेशात ८.२५ कोटी रुपये कमावले गेले. पहिल्या दिवशी 'स्काय फोर्स'ने १२ कोटी रुपयांची कमाई केली, त्यानंतर दुसऱ्या दिवशी २२ कोटी रुपये आणि तिसऱ्या दिवशी २८ कोटी रुपयांची कमाई झाली. दरम्यान, चित्रपटाच्या कमाईत घट झाली. चौथ्या दिवशी ७ कोटी रुपये, पाचव्या दिवशी ५.७५ कोटी रुपये, सहाव्या दिवशी ६ कोटी रुपये आणि सातव्या दिवशी ५.५ कोटी रुपये.

Sky Force Box Office Collection Day 8
Crazxy Release Date: 'दादी सो जा वरना....'; सोहम शहाने केली हटके स्टाईलमध्ये 'क्रेझी' चित्रपटाच्या रिलीजची घोषणा

१९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित हा चित्रपट भारतीय वायुसेना अधिकारी टी विजया (वीर पहाडिया यांनी साकारलेला) च्या कथेवर आधारित आहे. टी विजया हे बेपत्ता होताे त्यानंतर अक्षय कुमार विजयाला शोधण्याच्या प्रयत्न करतात. १६० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटात सारा अली खान आणि निमरत कौर प्रमुख भूमिकेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com