20 जून 2025 रोजी प्रदर्शित होणारा 'सितारे जमीन पर' (Sitaare Zameen Par ) हा बहुप्रतिक्षित चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 2007 साली प्रदर्शित झालेल्या 'तारे जमीन पर' या सर्वांच्या मनाला भिडलेल्या चित्रपटाचा हा एक सीक्वल आहे. चित्रपटाच्या प्रदर्शित झालेल्या ट्रेलरने हृदयस्पर्शी कथा, प्रेम, हास्य आणि आनंदाने भरलेली एक अद्भुत झलक दाखवली आणि आता या चित्रपटाचं संगीत देखील प्रेक्षकांच्या मनाला भिडत आहे.
नुकतेच 'सितारे जमीन पर' चित्रपटाचे 'शुभ मंगलम' (Shubh Mangalam) हे नवे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. लग्नसराईचा उत्साह, ऊर्जा आणि आनंद साजरा करणाऱ्या या गाण्यामुळे प्रेक्षकांमध्ये एक वेगळाच जल्लोष निर्माण झाला आहे. या गाण्याला हटके कॅप्शन दिले आहे. त्यांनी लिहिलं की, "'शुभ मंगलम' गाणं आता प्रदर्शित झालं आहे... प्ले करा आणि आनंदोत्सव सुरू करा!" त्यांच्या या गाण्यावर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.
'शुभ मंगलम' गाण्यामध्ये आमिर खान, जिनिलीया देशमुख आणि त्यांच्यासोबत 10 कलाकार धमाकेदार नृत्य करताना आणि मजा मस्ती करताना दिसत आहेत.'शुभ मंगलम' हे गाणं शंकर महादेवन आणि अमिताभ भट्टाचार्य यांनी गायले आहे. तर संगीत शंकर-एहसान-लॉय यांचे आहे. गाण्याचे बोल अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले आहेत.
चित्रपटात 10 नवोदित कलाकार अरूष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, सम्वित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भंसाली, आशीष पेंडसे, ऋषी शाहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर पाहायला मिळणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन आर. एस. प्रसन्ना यांनी केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.