'बडे अच्छे लगते है' फेम अभिनेता राम कपूर (Ram Kapoor) अलिकडेच त्याच्या वजनामुळे चांगलाच चर्चेत होता. आता मात्र तो एका वेगळ्या कारणामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. राम कपूरने नुकतीच लग्जरी कार खरेदी केली आहे. त्याच्या कारचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. राम कपूरला 'बडे अच्छे लगते है' या कार्यक्रमामुळे खूप लोकप्रियता मिळाली. राम कपूरच्या नवीन लग्जरी कारची किंमत जाणून घेऊयात.
'लॅम्बोर्गिनी उरुस एसई एसयूव्ही' ही कार भारतीय मार्केटमध्ये 2024 मध्ये आली.
आलिशान कारचा रंग मॅट ऑलिव्ह ग्रीन असा आहे.
कारची केबिन ब्लॅक आणि ऑरेंज शेडची आहे.
गाडीमध्ये प्लग-इन हायब्रिड सिस्टम देखील आहे.
आलिशान कारमध्ये 4.0 लिटर, ट्विन-टर्बोचार्ज्ड व्ही८ इंजिन मिळते.
लॅम्बोर्गिनीच्या या कारमध्ये 8 स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये हायब्रिड सिस्टममध्ये इलेक्ट्रिक मोटर वापरली जाते.
लॅम्बोर्गिनीच्या या मॉडेलमध्ये एलईडी हेडलाईट्स पाहायला मिळतात.
राम कपूरकडे लग्जरी कारचे कलेक्शन आहे. त्याच्याकडे वेगवेगळ्या कंपनीच्या, दमदार फीचर्स असलेल्या कार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, राम कपूरकडे पोर्श ९११, पोर्श ९११ टर्बो एस, फेरारी पोर्टोफिनो एम, रेंज रोव्हर ऑटोबायोग्राफी आणि मर्सिडीज-एएमजी जी ६३ या आलिशान कार आहेत.
आजवर राम कपूर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. त्याच्या अभिनयाचे चाहते दिवाने आहेत. राम कपूर 'मिस्ट्री' माध्यमातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 27 मे रोजी 'मिस्ट्री' जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. चाहते त्याच्या या नवीन प्रोजक्टसाठी खूपच उत्सुक आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.