Sitaare Zameen Par : 'गुड फॉर नथिंग...'; आमिरच्या 'सितारे जमीन पर'मधील पहिलं गाणं प्रदर्शित, पाहा VIDEO

Sitaare Zameen Par First Song : आमिर खानच्या 'सितारे जमीन पर' चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्यानं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
Sitaare Zameen Par First Song
Sitaare Zameen ParSAAM TV
Published On

'तारे जमीन पर' या २००७ मध्ये आलेल्या सुपरहिट चित्रपटाचा सिक्वल 'सितारे जमीन पर'च्या (Sitaare Zameen Par) धमाल आणि मनोरंजनाने भरलेल्या ट्रेलरनंतर आता या बहुप्रतिक्षित चित्रपटाचं पहिलं गाणं 'गुड फॉर नथिंग' (Good For Nothing ) प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ट्रेलरप्रमाणेच या गाण्यालाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे आणि चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. या गाण्यात आमिर खान (Aamir Khan) कोच गुलशनच्या भूमिकेत बास्केटबॉल टीमला ट्रेनिंग देताना दिसत आहेत.

'गुड फॉर नथिंग' हे गाणं प्रेक्षकांना एक धमाल अनुभव देणारं आहे, ज्यामध्ये कोच गुलशनचे एनर्जेटिक ट्रेनिंग, मुलांची मस्ती, मजा, मेहनत आणि सकारात्मक भावना एकत्रितपणे दाखवण्यात आली आहे. 'गुड फॉर नथिंग'मध्ये शंकर महादेवन आणि अमिताभ भट्टाचार्य यांचा मजेशीर आणि जोशपूर्ण आवाज ऐकायला मिळत आहे.

'सितारे जमीन पर' चित्रपटात अनेक नवीन चेहरे पाहायला मिळणार आहेत. यात आरुष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, सम्वित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भंसाली, आशीष पेंडसे, ऋषी शहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर यांचा समावेश आहे. 'शुभ मंगल सावधान' सारखा ब्लॉकबस्टर चित्रपट देणारे दिग्दर्शक आर. एस. प्रसन्ना आता 'सितारे जमीन पर'साठी आमिर खान प्रोडक्शन्ससोबत मोठ्या कोलॅबोरेशनसह परत येत आहेत.

आर.एस. प्रसन्ना दिग्दर्शित 'सितारे ज़मीन पर' 20 जून 2025 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.आमिर खान आणि जिनिलीया देशमुख प्रमुख भूमिकांमध्ये असलेल्या या चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. 'सितारे जमीन पर' चित्रपटात प्रेम, हास्य आणि भावनिक क्षण यांचा परिपूर्ण ताळमेळ साधण्यात आला आहे. 'सितारे जमीन पर' चित्रपटाची टॅगलाईन आहे की, "सबका अपना अपना नॉर्मल" जो सर्वांना स्वीकारण्याचा आणि समावेशकतेचा संदेश देते. ट्रेलरमध्ये आमिर खान एका बास्केटबॉल कोचच्या भूमिकेत दिसत आहे. जो दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवत आहे.

Sitaare Zameen Par First Song
Neha Pendse : नेहा पेंडसेच्या कातिल अदा पाहून चाहते फिदा, पाहा 'कान्स'मधील PHOTOS

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com