Sidhu Moosewala Death Anniversary: ७३० दिवस, १७५३२ तास अन्... सिद्धू मूसेवालाच्या आईची मुलासाठी भावूक पोस्ट

Sidhu Moosewala Mother Instagram Post: सुप्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू सिद्धूला जाऊन दोन वर्षे झाल्याने सिद्धूच्या आईने सोशल मीडियावर खास त्याच्यासाठी भावुक पोस्ट शेअर केली आहे.
Sidhu Moosewala Mother Charan Kaur
Sidhu Moosewala Mother Charan KaurSaam Tv

प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moosewala) याची २९ मे २०२२ रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. नुकतेच त्याच्या निधनाला दोन वर्षे पूर्ण झाले आहेत. सिद्धू मुसेवालाच्या अचानक जाण्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. अशातच सिद्धूला जाऊन दोन वर्षे झाल्याने सिद्धूच्या आईने सोशल मीडियावर खास त्याच्यासाठी भावुक पोस्ट शेअर केली आहे. (Latest News Marathi)

Sidhu Moosewala Mother Charan Kaur
Pushpa 2 Song: 'पुष्पा 2' चित्रपटातील 'अंगारो' गाणं रिलीज; पुष्पा आणि श्रीवल्लीच्या हटके डान्सने वेधलं लक्ष

सिद्धू मुसेवाला त्याच्या आई- वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे त्याच्या अचानक मृत्यूने आई वडिलांना धक्का बसला आहे. सिद्धूच्या दुसऱ्या पुण्यतिथीनिमित्त आई अवनीत चरणने सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट शेअर केली आहे.

सिद्धूच्या आईने सिद्धूसोबतचा फोटो शेअर करत त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "आज बाळा तुला जाऊन ७३० दिवस, १७५३२ तास, १०५१९०२ मिनिटे आणि ६३११५२०० सेंकद उलटून गेले आहेत. जेव्हा तू घरातून बाहेर पडलास तेव्हा मी प्रार्थना करत होते. संध्याकाळी शत्रूंनी माझ्यापासून माझा एकुलता एक मुलगा हिरावून घेतला. त्यानंतर आयुष्यात अंधार आला की सूर्य मावळेल की नाही, याची आशाच नव्हती. पण माझ्या गुरूंवर माझीक श्रद्धा होती, त्यांनी तुझे विचार आणि स्वप्न सत्यात आणले. त्यांच्या आशीर्वादाने मी पुन्हा एकदा आई झाले आहे. सिद्धू तू तुझे बाबा, तुझा छोटा भाऊ यांच्या नेहमीच आठवणीत राहशील. जरी तू आज आमच्यात नसला तरी मनात कायम आहे. मी गेले दोन वर्षे तुझ्या आठवणीत जगत आहे. आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत कठीण आहे."

Sidhu Moosewala Mother Charan Kaur
Radhika - Anant Ambani Wedding Date: अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नाची तारीख आणि ठिकाण ठरलं!

सोशल मीडियावर सिद्धूच्या आईची भावनिक पोस्ट व्हायरल होत आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स केली आहे. २९ जून २०२२ ला पंजाबच्या मानसा जिल्ह्यातील मूसा या गावाजवळ सिद्धू मुसेवालाची गोळ्या जाडून हत्या झाली होती. सिद्धू मूसेवालाचे लाखो चाहते आहेत. सिंद्धू रॅपसाठी लोकप्रिय होता.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com