Palak Muchhal: हजारो मुलांना जीवदान देणारी प्रसिद्ध गायिका; महान कार्याची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डकडून दखल

Palak Muchhal: गायिका पलक मुच्छलने ३८०० मुलांना हृदयशस्त्रक्रियांसाठी मदत करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव कमावलं. तिच्या सामाजिक कार्याचं कौतुक देश-विदेशात होत आहे.
Palak Muchhal:
Palak Muchhal:Saam Tv
Published On

Palak Muchhal: बॉलिवूडची प्रसिद्ध पार्श्वगायिका पलक मुच्छल हिने केवळ आपल्या मधुर आवाजाने नव्हे तर सामाजिक कार्यानेही जगभरात आपली ओळख निर्माण केली आहे. अल्पवयातच हजारो गरजू बालकांच्या हृदयशस्त्रक्रियांसाठी आर्थिक मदत करून पलकचं नाव आता ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स’ मध्ये नोंदवलं गेलं आहे.

पलकने आजवर ३,८०० हून अधिक मुलांच्या हृदयशस्त्रक्रियांसाठी निधी उभारला आहे. तिच्या ‘पलक मुच्छल फाउंडेशन’च्या माध्यमातून गेली अनेक वर्षं ती या कार्यात झटत आहे. इंदूरमध्ये जन्मलेल्या पलकला लहानपणी रेल्वे प्रवासादरम्यान काही गरीब मुलांना मदतीची गरज असल्याचं दिसलं आणि त्याच क्षणापासून तिने ठरवलं “मी मोठी झाल्यावर यांच्यासाठी काहीतरी करणारच!”

Palak Muchhal:
Actor Fake Death News: धर्मेंद्र यांच्यानंतर जॅकी चॅनच्या मृत्यूच्या अफवा, नेमकं सत्य काय?

या संकल्पनेवर ठाम राहून पलकने आपल्या प्रत्येक संगीत कार्यक्रमातून मिळणारे मानधन आणि कमाई थेट हृदयशस्त्रक्रियांसाठी वापरले. तिने फक्त मुलांच्या शस्त्रक्रियांसाठीच नव्हे, तर कारगिल शहीदांच्या कुटुंबांना मदत आणि गुजरात भूकंप पीडितांसाठी १० लाखांची देणगी दिली आहे.

Palak Muchhal:
Sanskruti Balgude: संस्कृती बालगुडे साकारणार कृष्ण अवतार; 'संभवामी युगे युगे' मधील कृष्णरूपाला 'या' अभिनेत्याचा आवाज

लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाही पलकने सेवा कार्य कधीच थांबवले नाही. ‘मेरी आशिकी, कौन तुझे, प्रेम रतन धन पायो’ यांसारखी हिट गाणी देणाऱ्या या गायिकेने नेहमीच सांगितलं आहे की, “माझा आवाज केवळ संगीतासाठी नाही, तर जीवनासाठी आहे.” तिचे पती आणि संगीतकार मिथुन यांनीही या प्रवासात तिची साथ दिली आहे.

पलकचं नाव आधीच लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंदले गेले होते आणि आता गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश होऊन तिच्या कार्याचे कौतुक जागतिक स्तरावर होत आहे. संगीताच्या माध्यमातून समाजासाठी झटणाऱ्या पलक मुच्छलने दाखवून दिलं आहे की प्रसिद्धीचा खरा अर्थ फक्त यश नसून ती दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश आणण्याची शक्ती आहे. पलकचा हा प्रवास हजारो बालकांच्या हृदयाला नवजीवन देणारा ठरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com