Sanskruti Balgude: संस्कृती बालगुडे साकारणार कृष्ण अवतार; 'संभवामी युगे युगे' मधील कृष्णरूपाला 'या' अभिनेत्याचा आवाज

Sanskruti Balgude: फॅशन, अभिनय आणि नृत्य या सर्व क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारी अभिनेत्री संस्कृती बालगुडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. लवकरच संस्कृती एका नव्या आणि खास अवतारात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Sanskruti Balgude
Sanskruti BalgudeSaam Tv
Published On

Sanskruti Balgude: फॅशन, अभिनय आणि नृत्य या सर्व क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारी अभिनेत्री संस्कृती बालगुडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण, तिच्या आगामी डान्स ड्रामा “संभवामी युगे युगे” मध्ये ती साकारणार आहे भगवान कृष्णाचे विविध पैलू! या अनोख्या प्रोजेक्टची ओळख काही दिवसांपूर्वी संस्कृतीने सोशल मीडियावर करून दिली आणि तिच्या कृष्णरूपाचे फोटो पाहताच चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला.

या प्रोजेक्टला आता आणखी एक खास स्पर्श मिळाला आहे. कारण संस्कृतीच्या कृष्णरूपाला आवाज देणार आहेत सुप्रसिद्ध अभिनेता सुमित राघवन. मराठी आणि हिंदी दोन्ही चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण केलेल्या सुमित राघवनच्या आवाजामुळे या प्रोजेक्टला एक नवा आत्मा लाभणार आहे.

Sanskruti Balgude
Actor Fake Death News: धर्मेंद्र यांच्यानंतर जॅकी चॅनच्या मृत्यूच्या अफवा, नेमकं सत्य काय?

संस्कृतीने सोशल मीडियावर सुमित राघवनसोबतचा फोटो शेअर करत ही आनंदवार्ता दिली. तिने लिहीले, “हे माझ्या आयुष्यातलं स्वप्नवत काम आहे. इंडस्ट्रीत येण्याआधीपासून मी सुमित दादाची चाहती होते आणि आता माझ्या मनाच्या अगदी जवळच्या प्रोजेक्टसाठी आम्ही एकत्र काम करतोय हे माझ्यासाठी खूप खास आहे. कृष्णाचा आवाज कोण देणार यावर विचार करताना पहिलं नाव दादाचंच आलं आणि त्यांनी होकार दिला, ही माझ्यासाठी फॅन मोमेंटच होतं.”

Sanskruti Balgude
Prem Chopra Hospitalised: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोपड़ा यांची प्रकृती बिघडली; मुंबईच्या रुग्णालयात दाखल

दरम्यान, सुमित राघवनदेखील या प्रोजेक्टबद्दल तेवढाच उत्साही आहे. तो म्हणतो, “जेव्हा संस्कृतीने मला या प्रोजेक्टबद्दल सांगितलं, तेव्हा तिच्या कामातील जिद्द आणि तपशीलवार दृष्टी बघून मी लगेच होकार दिला. कृष्ण हा केवळ देव नाही, तो सखा आहे, मार्गदर्शक आहे आणि अशा भूमिकेला आवाज देण्याची संधी मिळणं ही अभिमानाची बाब आहे.”

“संभवामी युगे युगे” या डान्स ड्रामामध्ये कृष्ण लीला आणि त्याची विविध रूपे संस्कृती नृत्याच्या माध्यमातून सादर करणार आहे. त्यासोबत सुमित राघवनचा गहिरा, भावनांनी ओथंबलेला आवाज हे या नृत्यनाट्याचे खास आकर्षण ठरणार आहे. प्रेक्षकांसाठी हा एक अनोखा अनुभव ठरणार असून, संस्कृती बालगुडेच्या अभिनय आणि नृत्याला सुमित राघवनचा आवाज लाभल्याने “संभवामी युगे युगे” हा प्रोजेक्ट नक्कीच अविस्मरणीय ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com