Siddharth Jadhav : अर्थशास्त्राच्या पेपरला सिद्धार्थ जाधवनं काढलं 'या ' अभिनेत्याचे चित्र, नेमकं 'त्यावेळी' काय घडलं?

Siddharth Jadhav Share Exam Funny Story: मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवने परीक्षेदरम्यान घडलेला एक मजेशीर किस्सा सांगितला आहे. तो नेमकं काय म्हणाला, जाणून घेऊयात.
Siddharth Jadhav Share Exam Funny Story
Siddharth JadhavSAAM TV
Published On

मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) कायम आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. आजवर त्याने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच्या अभिनयाचे चाहते दिवाने आहेत. त्याने चित्रपट, मालिका आणि नाट्य क्षेत्र गाजवले आहे. तो एक कॉमेडी कलाकार आहे. तो कायम उत्साही पाहायला मिळतो. नुकत्याच झालेल्या एका मिडिया मुलाखतीत सिद्धार्थने आपल्या आयुष्यातील एक मजेशीर किस्सा सांगितला आहे.

अभिनेता सिद्धार्थ जाधवने मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे, "त्याची बारावीची परीक्षा सुरू होती. त्याने रात्रभर जागून इतिहासाचा अभ्यास केला होता. मात्र सकाळी जेव्हा पेपरला गेला तेव्हा त्याला कळले की, आज अर्थशास्त्र या विषयाची परीक्षा आहे. हे समजताच त्याचा गोंधळ उडाला. पेपर दुपारी 3 चा होता आणि मी सकाळी 11ला परीक्षा केंद्राबाहेर पोहोचलो. मग सिद्धार्थने त्याच्या मित्राच्या घरी जाऊन थोड अभ्यास केला."

पुढे सिद्धार्थने सांगितल्याप्रमाणे, "सिद्धार्थचा मित्र दादरला राहायचा. सिद्धार्थने त्याच्याकडे जाऊन ताबडतोब इकॉनॉमिक्सचे ऑब्जेक्टिव्ह शिकून घेतले. सिद्धार्थ ऑब्जेक्टिव्ह शिकून झाल्यावर पेपरला गेला. तीन तास परीक्षा हॉलमध्ये बसलो. पेपर लिहून झाल्यावर सिद्धार्थ जाधव चक्क प्रभू देवाचं चित्र काढत बसला होता. सिद्धार्थने या इकॉनॉमिक्सच्या पेपरमध्ये 35 मार्क मिळवले आणि तो पास झाला. "

सिद्धार्थ जाधवचा नुकताच 'आता थांबायचं नाय' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट 1 मे ला रिलीज झाला आहे. सिद्धार्थ जाधवचा 'होऊ दे धिंगाणा' हा शो देखील खूप गाजतो. शो मधील त्याच्या एनर्जीचे सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळते. सिद्धार्थचे चाहते त्याच्या आगामी प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Siddharth Jadhav Share Exam Funny Story
Ajaz Khan : बलात्काराच्या गुन्ह्यानंतर एजाज खान बेपत्ता; घराला लॉक, फोनही बंद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com