Shilpa Shetty and Shamita Shetty: शिल्पा शेट्टी आणि शमिता शेट्टी कपिल शर्माच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या (सीझन 3) राखी विशेष भागात पाहुण्या म्हणून आल्या आणि दोघींनी मिळून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. या एपिसोडमध्ये बहिणींचा आपुलकीचा संवाद, जुन्या आठवणी आणि विनोदाची बरसात झाली.
शिल्पाने थोड्या मस्करीत आणि थोड्या गंभीरपणे कबूल केले की ती आपल्या धाकट्या बहिणी शमितासाठी नेहमीच योग्य जोडीदार शोधत असते. अगदी अनोळखी पुरुषांना सुद्धा ती थेट विचारते – “लग्न झालं आहे का?”, आणि लगेच स्पष्ट करते की हा प्रश्न तिच्यासाठी नाही, तर बहिणीसाठी आहे. कपिल शर्माने संभाषणादरम्यान हुमा कुरेशी डेटिंग अॅपशी जोडलेली असल्याचा उल्लेख केला, तेव्हा शिल्पाने लगेच शमिताला सुचवले – “तिथे जाऊन बघ.”
यावर शमिताने स्मितहास्य करत उत्तर दिले की आजच्या काळात खरं प्रेम शोधणं सोपं नाही. चुकीच्या नात्यापेक्षा सिंगल राहणं तिला जास्त योग्य वाटतं. तिच्या या स्पष्ट बोलण्याला प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
एपिसोडमध्ये भावनिक आठवणींचाही रंग चढला. दोघींनी त्यांच्या बालपणीची एक गंमतीशीर पण खरी गोष्ट सांगितली त्यांची आई अत्यंत कडक शिस्तीची होती आणि शिस्त लावण्यासाठी कधी झाडू तर कधी चप्पलने त्या दोघींंना फटके दिले असल्याची गोड आठवण त्यांनी सांगितली. शमिताने हसत सांगितले की, “आईच्या या पद्धतीमुळे आम्ही दोघीही बऱ्याच प्रमाणात सावरलो.”
हास्य, मस्करी, प्रेम आणि कौटुंबिक आठवणी यांचा सुंदर संगम असलेला हा भाग प्रेक्षकांसाठी एक धमाल अनुभव ठरला. शिल्पा-शमिता यांच्या जिवलग नात्याची झलक या शोमधून स्पष्टपणे दिसून आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.