Shardul Pandit On Om Raut: बिग बॉस फेम अभिनेत्याने ‘आदिपुरूष’च्या निर्मात्यांवर केली सडकून टिका...

Shardul Pandit Criticized Adipurush Film: शार्दुल पंडितनेही ‘आदिपुरूष’च्या निर्मात्यांना फटकारले आहे.
Shardul Pandit Criticized Adipurush Makers
Shardul Pandit Criticized Adipurush MakersInstagram
Published On

Shardul Pandit Criticized Adipurush Makers: बॉलिवूडचा बिगबजेट चित्रपट ‘आदिपुरूष’ प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाला प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी चित्रपटाला ग्रेट म्हणाले आहेत, तर कोणी देवाचा अपमान करणारा चित्रपट म्हणत आहेत. रामानंद सागर यांच्या ‘रामायण’मध्ये रामाची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविलपासून ते हनुमानापर्यंत दारा सिंह यांचा मुलगा बिंदू सिंग यांनी या चित्रपटावर प्रतिक्रिया व्यक्त केली. रामानंद सागर यांच्या मुलानेही या चित्रपटावर आपले मत मांडले. त्याचवेळी आता शार्दुल पंडितनेही ‘आदिपुरूष’च्या निर्मात्यांना फटकारले आहे.

Shardul Pandit Criticized Adipurush Makers
Bigg Boss OTT 2 1st Day : 'बिग बॉस ओटीटी २' सगळेच वरचढ ; काहींची नवी सुरुवात तर काहींचा पहिल्याच दिवशी रामराम

बिग बॉस सीझन १४ मधून प्रसिद्धी झोतात आलेल्या शार्दुल पंडितने सोशल मीडियावर ‘आदिपुरूष’ बद्दल एक विशेष पोस्ट लिहीली. यासोबतच अनेक व्हिडीओही शेअर केले आहेत, ज्यामध्ये त्याने चित्रपटातील संवाद विचित्र असल्याचे सांगितले आहे. त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर स्टोरीमध्ये त्याने लिहिले की, “मी धर्माशी संबंधित गोष्टींवर भाष्य करणे टाळतो, पण हे त्याविषयी नाही. जर तुम्ही रामायण आणि राम यांसारख्या महाकाव्य विषयावर चित्रपट बनवत असाल, जो ऐतिहासिक, पौराणिक, साहित्य आणि भावनांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. तुम्ही त्याच्या प्रचारासाठी कोणतीही युक्ती स्वीकारत असाल. बघा, आम्हालाही आमच्या मुलांना रामायण दाखवून शिकवायचे आहे. पण तुम्ही रामायण संवादांनी नष्ट करू शकत नाही.”

Shardul Pandit Criticized Adipurush Makers
Bigg Boss OTT 2 Grand Premier : 'बिग बॉस ओटीटी 2'मध्ये स्पर्धकांची ग्रँड एन्ट्री ; शोमधील १३ व्या स्पर्धकाला पाहून सगळेच थक्क
Shardul Pandit On Om Raut
Shardul Pandit On Om Raut Instagram

तर त्याच्या पुढच्या पोस्टमध्ये शार्दुल म्हणतो, “तुम्ही या चित्रपटासाठी किती कोटी रुपयांचा खर्च केलाय हे मला माहीत नाही. या चित्रपटाला किती स्टार मिळाले आहेत? तुम्ही किती पैसे कमावले आहेत? त्या विषयासंबंधित थोडे संशोधन करा. त्या विषयी थोडा अभ्यास करा. जेव्हा तुम्ही या विषयाला सामोरे जाता तेव्हा थोडा आदर दाखवायला हवा.” त्याचवेळी शार्दुलने व्हिडिओमध्येही हेच सांगितले की, “जर तुम्ही चित्रपटाची कथा येणाऱ्या पिढीला दाखवणार असाल तर त्याच्या निर्मितीसाठी, संशोधनसाठी कष्ट तर घेऊच शकता ना?”

शार्दुल पंडित त्याच्या पुढील व्हिडीओत म्हणतो, “तुम्ही चित्रपटाच्या निर्मितीसाठी किती कोटींचा खर्च याची मला माहिती नाही. हनुमानजी सुद्धा चित्रपटात एका वेगळ्याच अंदाजात बोलत आहे.”अनेक विषयावर त्याने निर्मात्यांवर सडकून टिका केली आहे.

Shardul Pandit On Om Raut
Shardul Pandit On Om Raut Instagram

आदिपुरुष चित्रपट १६ जूनला थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला असून चित्रपटाने एकाच दिवसात ९५ कोटींची छप्पर फाडके कमाई केली आहे. तर जगभरात चित्रपटाने १२५ कोटींच्या आसपास कमाई केली आहे. चित्रपटात प्रमुख भूमिकेत प्रभास प्रभु श्री रामांच्या, क्रिती सेनन माता जानकीच्या तर, सनी सिंग लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसणार आहे.

सोबतच देवदत्त नागे हनुमानाच्या तर, सैफ अली खान रावणाची व्यक्तीरेखा साकारतोय. चित्रपटातील कलाकारांनी ही तगड मानधन घेतले आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाआधीच कोट्यावधींची कमाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com