Sharad Ponkshe On Cancer : काळ कठीण होता! तरीही लढाई जिंकलो, शरद पोंक्षेंनी सांगितलं त्यांचा कॅन्सरचा लढा

Sharad Ponkshe: अभिनेत्री भार्गवी चिरमुलेच्या 'गप्पा मस्ती' पॉडकास्टमध्ये शरद पोंक्षे सहभागी झाले होते.
Sharad Ponkshe Post For Daughter
Sharad Ponkshe Post For Daughter saam tv
Published On

Sharad Ponkshe Fight With Cancer : अभिनेते शरद पोंक्षे अप्रतिम नट आहेत. अनेकदा ते त्यांच्या परखड वक्तव्यामुळे देखील चर्चेत असतात. त्यांना काही काळापूर्वी कॅन्सरने ग्रासलं होत. त्यांनी कॅन्सरला मत देऊन आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे.

पूर्वीच्या जोमाने आणि ताकदीने त्यांनी कामाला सुरुवात केली. आज ते अनेक मालिका आणि नाटकनाचे भाग आहेत. तसेच ते विविध कार्यक्रम देखील करत असतात. अभिनेत्री भार्गवी चिरमुलेच्या 'गप्पा मस्ती' पॉडकास्टमध्ये शरद पोंक्षे सहभागी झाले होते.

'गप्पा मस्ती' या पोस्टकास्टमध्ये भार्गवीने शरद पोंक्षे यांना त्यांनी कॅन्सरला कशी मात दिली याविषयी विचारले. यावर उत्तर देत शरद पोंक्षे तिला म्हणाले, "संकट कुठलही असो, शारिरीक, मानसिक, आर्थिक आपण पहिले ते स्वीकारलं पाहिजे. आपण ते स्वीकारत नाही, स्वीकारायला खूप वेळ घेतो. मग त्यावर मार्ग सापडायला अजून वेळ जातो.

Sharad Ponkshe Post For Daughter
Priya Berde Serial: प्रिया बेर्डेचं टीव्ही जगतात पुनरागमन ; नव्या मालिकेत साकारणार महत्त्वाची भूमिका

मला कॅन्सर झालाय हे मी दुसऱ्या दिवशी स्वीकारलं. डॉक्टरांनी मला माझ्या जगण्या वाचण्याची शक्यता ५० टक्के आहे असे सांगितले. जर काही चमत्कार झाला तरच वाचेन. मी सामान्य माणूस आहे. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. अरे बापरे, ही काय भानगड झाली? हा एक रात्र विचार केला. पण दुसऱ्या दिवशी हे सर्व स्वीकारलं."

डॉक्टर म्हणाले चलो, लढते है अभी. आता काय-काय करायचं आहे ते सांगा, असं मी डॉक्टरना म्हणालो. माझा आध्यात्मावर विश्वास आहे. त्यामुळे घरात गेल्यावर आध्यात्मिक दृष्टीने मी काय-काय करू शकतो? आयुर्वेदात काय-काय उपचार आहेत? हे सगळं शोधायला सुरुवात केली.

मैदानात उतरलो आहे, तर आता लढायचं आहे. लढण्यापूर्वी पहिली शस्त्र काय-काय आहेत? मग घोड्यावर बसून लढायला जायचं आहे? की बाईकवर बसून जायचं आहे? रणगाड्यात बसून जायचं आहे की कसं? माझ्याकडे उपलब्ध काय-काय आहे? तर माझ्याकडे एवढे-एवढे पैसे आहेत हे पाहून बॉम्बे हॉस्पिटलला गेलो.

सुई, उपचार तेच असतात. उगाच ते दाखवायला असतं की, इंग्लंडला जाऊन मी उपचार घेतले. त्याची काही गरज नाहीये. जगातील कुठल्याही इतर देशात जायची गरज नाही. भारतामध्ये मुंबई शहरात जगातील सर्वोत्तम उपचार मिळतात. जगातील सर्वोत्तम डॉक्टर, इंजिनिअर आपल्या देशात आहेत.”

Sharad Ponkshe Post For Daughter
Ghoomer Official Trailer: 'Life Is Magic Game...', अभिषेक-संयमीची जोडी पहिल्यांदाच झळकणार; 'घुमर'चा हृदयस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित

“हे सगळं झाल्यावर पहिला वेळ कशात जातो तर, मलाच का झालं? मी कोणाच काय वाकडं केलं? हा स्वतःबद्दलचा खूप मोठा गैरसमज आहे. प्रत्येकाला असं वाटतं असतं की, मी कोणाचं काहीही वाकडं केलं नाही.

मी कोणाशी काही वाईट वागलो नाही. मी कधी कोणाचं वाईट केलेलं नाही. मग माझ्याच वाट्याला का आलं? हे माझे भोग आहेत. कधीतरी मी कोणाशी वाईट वागलो असेल. कुणाला तरी दुखावलं असेल. त्या सगळ्याचे परिणाम आता माझे मला भोगायचे आहेत. म्हणून शिक्षा भोगून संपवू या, हे स्वीकारा.”

“खरी लढाई माणूस मैदानात जिंकत नाही, तर स्ट्रॅटेजीमध्ये जिंकतो. लढायला उतरण्याच्या आधीची रात्र असते ना. काय करायचं आहे? कशा पद्धतीने लढाई लढायची आहे? समोरचा शत्रू कोण आहे? शिवाजी महाराजांकडे काय होतं? ५ लाख औरंजेबाच्या सैन्यासमोर ५-१० हजार सैन्य घेऊन ते लढायचे, जिंकायचे. का तर स्ट्रॅटेजी.

स्वतःवरचा विश्वास, स्वतःच्या बुद्धीमत्तेवर विश्वास, स्वतःच्या कर्तुत्वावर विश्वास आहे म्हणूनच त्याच्यातून ते बाहेर आले ना. एकदम सामोरे गेलो तर आपण नाही जिंकू शकणार. मग बिळातून बाहेर याचं आणि लढायचं. यातून गनिमी कावा निर्माण झाला. परिस्थितीतून मार्ग काढला.

बाजीराव पेशवे का नाही एकही लढाई हरले? हरू शकले असते समोरासमोर लढले असते तर. पण नाही, लढाई लढायच्या अगोदरची स्ट्रॅटेजी ठरवणं फार महत्त्वाचं आहे,” अशी उदाहरण देत शरद पोक्षें यांनी त्यांच्या कॅन्सरच्या लढाईविषयी सांगितलं.

“आता माझी लढाई कोणाशी आहे, कॅन्सरीबरोबर आहे. तो बरा न होणारा आहे. पण त्याला मी बरा करतो. शरीरात आणि आयुष्यात बदल काय-काय होऊ शकतात. तर मग आर्थिक गणित बिघडणार आहे. पुढील वर्षभर मी एकही रुपया कमवणार नाहीये. घरात कोणी कमवणार नाहीये. आर्थिक परिस्थितीत काय-काय करावं लागेल. इकडे काय करावं लागेल तिकडे काय करावं लागेल, अशा सगळ्या लढायांचा विचार केला गेला.

पाच-सहा दिवस घेतले आणि मग उभा राहिलो. बॉम्बे हॉस्पिटलच्या इथे टॅक्सीतून उतरलो अन् म्हटलं चलो. आणि मी कॅन्सरची लढाई जिंकलो. जर सेनापती उभा राहिला ना मग प्रत्येकजण त्याच्यासाठी लढायला उभा राहतो.

तशी माझी बायको. मनापासून जे काही आध्यात्मिक आहे, ते माझ्यासाठी करायला लागली. माझी मुलं बापासाठी जे काही करू शकता, ते करायला तयार झाली. माझ्या आईने अथर्वशीर्ष मंत्र उपचार सुरू केले. मग तुळस, कडुलिंबाचा पाला ते सगळं मिक्स करू रोज सकाळ-संध्याकाळ द्यायला सुरुवात केली.”

"मग केस गेले. केस विचित्र झाले. माझे एवढे सुंदर, घनदाट आणि मस्त केस होते. पण आता ते गेले परत तर कधी येणार नाहीत. मग काय करायचं? याच्यावर मार्ग काढूया असं ठरवलं. दोन-चार विग मेकर्सना विचारलं, ते पण काही व्यवस्थित सांगेना. आलेले थोडेफार काही केस आहेत, ते पण नीट होईना.

मग मुलगा म्हणाला, बाबा अंधेरीला हेअर रिन्यूएशनचा चांगला स्टुडिओ आहे, तिथे जाऊन बघू या. मग तिथे गेलो. ते बांगलादेशी मुलगी चालवते. ती म्हणाली, मी करून देते. तिनं मला हा विग बनवला. हा विग आहे, हे मला सांगायला काही लाज वाटत नाही. त्यात लपवायच काय? खोटं वागायचंच नाही. काही गरजच नाही.”

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com