Shahrukh Khan: मन्नतच काम सुरू; गौरी खानने विकला करोडोंचा फ्लॅट, किती फायदा झाला? थक्क करणारा आकडा समोर

Shahrukh Khan Wife Gauri Khan: प्रसिद्ध इंटीरियर डिझायनर आणि अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खानने मुंबईतील दादर पश्चिम भागातील एक आलिशान अपार्टमेंट विकले आहे.
Shahrukh Khan Wife Gauri Khan
Shahrukh Khan Wife Gauri KhanSaam Tv
Published On

Shahrukh Khan Wife Gauri Khan: प्रसिद्ध इंटीरियर डिझायनर आणि अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खानने मुंबईतील दादर पश्चिम भागातील एक आलिशान अपार्टमेंट 11.61 कोटी रुपयांना विकले आहे. गौरीने हे अपार्टमेंट ऑगस्ट 2022 मध्ये 8.5 कोटी रुपयांना खरेदी केले होते. म्हणजेच, तीन वर्षांच्या कालावधीत या संपत्तीच्या किंमतीत 37% वाढ झाली आहे.​

दादर पश्चिम हा मुंबईतील एक प्रमुख कनेक्टिव्हिटी असलेला परिसर आहे. हा भाग पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्ग तसेच पूर्व आणि पश्चिम एक्सप्रेस महामार्गांच्या जवळचा आहे. शिवाजी पार्क, प्रभादेवी, माटुंगा आणि वरळी यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांच्या जवळ असल्यामुळे हा परिसर निवासींसाठी अत्यंत आकर्षक असून असंख्य मुंबईकर या ठिकाणी घर घेण्याचे स्वप्न नक्की पाहतात.

Shahrukh Khan Wife Gauri Khan
Salman Khan Lookalike Arrest: रस्त्यावर असभ्य वर्तन; सलमान खानला अटक? पोलिसांची मोठी कारवाई

गौरी खानने विकलेले अपार्टमेंट कोहिनूर अल्टिसिमो इमारतीत स्थित आहे, हा कोहिनूर सीटीएनएल इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडने विकसित केलेला रेडी-टू-मूव्ह निवासी प्रकल्प आहे. यामध्ये 2.5 बीएचके, 3 बीएचके आणि 3.5 बीएचके अशा विविध प्रकारच्या फ्लॅट्सचा समावेश आहे. गौरीच्या अपार्टमेंटचे क्षेत्रफळ 184.42 चौरस मीटर (सुमारे 1,985 चौरस फूट) असून त्यात 167.55 चौरस मीटर (सुमारे 1,803.94 चौरस फूट) कार्पेट एरिया समाविष्ट आहे. या व्यवहारात दोन कार पार्किंग स्पेसचाही समावेश होता.​

Shahrukh Khan Wife Gauri Khan
Chhorii 2 Trailer: 'एक घंणा बड़ा राज्य था...'; अंगावर काटा आणणारा 'छोरी २' चा भयानक ट्रेलर प्रदर्शित

महाराष्ट्राच्या महानिरीक्षक नोंदणी (IGR) च्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या संपत्ती नोंदणी दस्तऐवजांनुसार, या संपत्तीचा व्यवहार अधिकृतपणे मार्च 2025 मध्ये नोंदवला गेला. गौरी खानच्या या व्यवहारामुळे मुंबईतील रिअल इस्टेट बाजारपेठेतील वाढत्या किंमतींचे आणि गुंतवणुकीच्या संधींचे प्रतिबिंब दिसून येते.​ तसेच, लवकरच शाहरुख खानच्या 'मन्नत' घराच्या नूतनीकरणाचे काम सुरू होणार आहे. यामध्ये बंगल्याच्या काही भागांचा विस्तार केला जाऊन अधिक दोन मजले बांधण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या गौरी खान तिच्या घरांमुळे सोशल मिडीयावर चर्चेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com