Bigg Boss 16: चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शाहरुखची अनोखी शक्कल, 'या' कार्यक्रमातून करणार प्रमोशनचा श्रीगणेशा...

'पठान'चा ट्रेलरही उद्या रिलीज होणार आहे, पण अजुनही कलाकारांनी चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात केलेली नाही.
Shahrukh khan and salman khan image
Shahrukh khan and salman khan imageSaam Tv

Bigg Boss 16: शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणचा 'पठान' चित्रपट 25 जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 'बेशरम रंग' या पहिल्या गाण्यापासूनच वादात आलेल्या 'पठान'मधील गाणे सतत चर्चेत आहे. त्यातच आता 'पठान'चा ट्रेलरही उद्या रिलीज होणार आहे, पण अजुनही कलाकारांनी चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात केलेली नाही.

Shahrukh khan and salman khan image
Pathaan Trailer Release Tomorrow: 'मिलते है मैदान पर...' 'पठान'बाबत शाहरुखने केलेल्या ट्वीटचा अर्थ काय?

मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख सलमानच्या 'बिग बॉस 16' मधून चित्रपटाच्या प्रमोशनचा श्रीगणेशा करु शकतो. शाहरुखला 'पठान'साठी सलमानची गरज भासली आहे, असं बोललं तरी वावगं ठरणार नाही. सध्या मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख खान 'पठान'च्या प्रमोशनसाठी बिग बॉसच्या घरात जाणार आहे. या कार्यक्रमातून सलमान खानही त्याला सपोर्ट करणार आहे.

Shahrukh khan and salman khan image
Bigg Boss Marathi 4 Runner Up: अपुर्वाचा विजेतापद हुकल्यानंतरची खास पोस्ट, म्हणते 'प्रवास संपला तरीही...'

आता पुन्हा एकदा दोन्ही खान ब्रदर्स बिग बॉसच्या माध्यमातून प्रमोशनचे निमित्त साधत एकत्र दिसणार आहेत, त्यामुळे दोघांच्याही चाहत्यांसाठी ही गुड न्युजच म्हणावी लागेल. याआधीही अनेकदा शाहरुख शिवाय अनेक कलाकारांनी चित्रपटाच्या प्रमोशनकरीता बिग बॉस शोची निवड केली होती.

Shahrukh khan and salman khan image
Shark Tank India 2: 'शार्क टँक इंडिया २'च्या परीक्षकांची किती आहे संपत्ती? जाणून घ्या

शाहरुख खानच्या 'पठान' चित्रपटावरून अनेक वाद झाले होते. 'बेशरम रंग' या गाण्यात दीपिका पदुकोणच्या भगव्या बिकिनीवरुन बराच गदारोळ झाला होता. त्या गाण्यामुळे नेटकऱ्यांनी चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली होती.

सोबतच चित्रपटातील 'झूमे जो पठाण' गाण्यालाही नेटकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. या गाण्यावर पाकिस्तानी गायकाने त्याच्या गाण्याची कॉपी केल्याचा आरोप केला होता. आता या सगळ्यात 'पठान'चा ट्रेलर उद्या प्रदर्शित होणार आहे.

Shahrukh khan and salman khan image
Ved Box Office Collection: रितेश जिनिलीयाच्या 'वेड'ची बॉक्स ऑफिसवर गरुडझेप, अनेक बॉलिवूड चित्रपटांना टाकले पिछाडीवर...

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण व्यतिरिक्त जॉन अब्राहम ही 'पठान'चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर सलमान खान देखील चित्रपटात दिसण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत बिग बॉस 16 पासून 'पठान'चे प्रमोशन सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्याचबरोबर 'पठान'नंतर शाहरुख खान 'जवान' आणि 'डंकी'मध्ये दिसणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com