हातात बंदूक, तोंडात गुलाब अन् खणखणीत डायलॉग! 'किंग' शाहरुखचा खतरनाक लुक आऊट; चित्रपटाची तारीख नोट करून ठेवा

SHAH RUKH KHAN'S 'KING' NEW POSTER OUT : पठाण आणि जवानच्या ऐतिहासिक यशानंतर बॉलिवूडचा 'किंग' शाहरुख खान पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर थरार आणण्यासाठी सज्ज झाला आहे.
SHAH RUKH KHAN'S 'KING' NEW POSTER OUT
SHAH RUKH KHAN'S 'KING' NEW POSTER OUTsaam tv
Published On: 

बॉलिवूडचा 'किंग' शाहरुख खान पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे. वर्ष २०२३ मध्ये 'पठान' आणि 'जवान' सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांनंतर शाहरुख आता त्याच्या आगामी 'किंग' या चित्रपटावर पूर्ण लक्ष केंद्रित करत आहे. हा ॲक्शन-थ्रिलर चित्रपट यंदा ख्रिसमसच्या मुहुर्तावर म्हणजेच २४ डिसेंबर २०२६ रोजी सिनेमागृहात दाखल होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा एक नवीन आणि अतिशय दमदार पोस्टर रिलीज करण्यात आला आहे.

पोस्टरमधील खास अंदाज

या नवीन पोस्टरमध्ये शाहरुख खान आग आणि बारूदाने पेटलेल्या जागेच्या मध्यभागी उभा असलेला दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यावर जखमेच्या खुणा, हातात रिव्हॉल्व्हर आणि तोंडात लाल रंगाचे गुलाब आहे. या धमाकेदार पोस्टरसोबत शाहरुख खानने एक मजेशीर कॅप्शनही शेअर केले आहे.

SHAH RUKH KHAN'S 'KING' NEW POSTER OUT
Madhuri Dixit: सोनेरी साडी अन् नाजूक टिकली; माधुरी दीक्षितचा गोल्डन साडीतील मनमोहक शाही अंदाज

शाहरुख खानचा हा नवीन लूक आणि डायलॉग सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या पोस्टरमध्ये शाहरुख सॉल्ट-अँड-पेपर लूकमध्ये असून, त्याच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर रक्ताचे व जखमांचे व्रण दिसत आहेत, जे त्याच्या पात्रातील डॅशिंग आणि खतरनाक पार्श्वभूमीची साक्ष देतात. एका हातात रिव्हॉल्व्हर आणि तोंडात लाल गुलाब असण्याचा हा विरोधाभासी अंदाज त्याच्या "कातिल नाही, आशिक हूं" या डायलॉगशी अचूक मेळ जुळतो आहे.

SHAH RUKH KHAN'S 'KING' NEW POSTER OUT
Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफला टार्गेट करण्यामागचं नेमकं कारण काय? गोळीबार प्रकरणात नवे खुलासे

दिग्दर्शन आणि तगडी स्टार कास्ट

'किंग' चित्रपटाचे दिग्दर्शन ॲक्शन चित्रपटांचे मास्टर मानले जाणारे सिद्धार्थ आनंद करत आहेत. या चित्रपटाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे, याद्वारे शाहरुखची लेक सुहाना खान हिचे मोठ्या पडद्यावर पदार्पण होत आहे. याशिवाय चित्रपटात शाहरुख आणि सुहानासोबत अभिषेक बच्चन, अभय वर्मा, अनिल कपूर आणि दीपिका पादुकोण यांसारखे दिग्गज कलाकार झळकणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com