Film On Seema Haider And Sachin Meena:PUBG गेममुळे अनेकांचे जसे संसार उद्ध्वस्त झाले, तसेच अनेकांनी संसार थाटले आहे. सध्या सर्वत्र सीमा हैदर- सचिन मीना हे नाव कमालीचं चर्चेत आहे. पाकिस्तानातून नेपाळमार्गे भारतात आलेल्या सीमा हैदरचं आणि भारतात राहणाऱ्या सचिन मीणासोबत PUBG गेममुळे सुत जुळलं. प्रेमाला भारतात भेटायला सीमा आली अन् वादाच्या कचाट्यात सापडली. लवकरच या कपलची लव्हस्टोरी प्रेक्षकांना रूपेरी पडद्यावर पाहता येणार आहे. कराची टू नोएडा असं या चित्रपटाचं नाव असून चित्रपटाकरीता ऑडिशनला सुरुवात झाली आहे.
सीमा- सचिनच्या या हटक्या लव्हस्टोरीवर आधारित ‘कराची टू नोएडा’ या चित्रपटाच्या ऑडिशनला नुकतीच सुरूवात झाली आहे. चित्रपटाची निर्मिती जानी फायरफॉक्स करत असून आगामी वर्षात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या सोशल मीडियावर ‘कराची टू नोएडा’ या चित्रपटाच्या ऑडिशन दरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओत, दोन कलाकार हे कॅमेऱ्यासमोर ऑडिशन देताना दिसत आहेत. या व्हायरल व्हिडीओने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये, प्रॉडक्शन हाऊसने एक व्हिडीओ व्हायरल केला आहे. त्या व्हिडीओमध्ये ऑडिशनसाठी एक मुलगा आणि एक मुलगी आलेली दिसते. एक मुलगी सचिनसोबत फोनवर बोलताना दिसते. सीमा हैदरच्या भूमिकेसाठी देशभरातील अनेक अभिनेत्री आणि मॉडेल्स ऑडिशनसाठी येत आहेत. (Bollywood Film)
फोनवर बोलत असलेली मुलगी सीमा हैदर सारखीच दिसतेय. सीमा आणि सचिनच्या लव्हस्टोरीवर बेतलेल्या चित्रपटात सीमाच प्रमुख भूमिकेत दिसेल अशी चर्चा होत होती. पण अद्याप प्रॉडक्शन हाऊसने आणि सीमाने याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, ‘कराची टू नोएडा’ चं थीम साँग पुढच्या आठवड्यात अमित जानी लाँच करणार आहेत. (Viral Video)
‘कराची टू नोएडा’मध्ये कोणते कलाकार प्रमुख भूमिका साकारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. चित्रपटात कोणते कलाकार झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सीमा हैदर हिला दिग्दर्शक अमित जानी यांनी ‘अ टेलर मर्डर स्टोरी’ (A Tailor Murder Story) ची ऑफर दिली होती. दिग्दर्शकांनी चित्रपटामध्ये सीमाला रॉ एजंटच्या भूमिकेची ऑफर दिली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.