Vivek Agnihotri Reaction: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा OMG 2 चित्रपट अखेर आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. प्रदर्शनापूर्वीच अक्षयचा हा चित्रपट काही प्रमाणात वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. चित्रपट येत्या ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने हे २७ कट्स सुनावले होते. OMG 2 मध्ये सेन्सॉर बोर्डाने अनेक बदल सुचवल्यामुळे विवेक अग्निहोत्रींनी आता सेन्सॉर बोर्डावर टिका केलीय. इतकंच नाही तर, विवेक अग्निहोत्रींनी टीका करताना, सेन्सॉर बोर्डावर बंदी घालण्याची मागणी केलीय.
एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत विवेक अग्निहोत्रींनी OMG 2 वरून सेन्सॉर बोर्डावर टीका केली आहे. ते म्हणतात, “अक्षयच्या भूमिकेत केलेला बदल मला मान्य नाही. सेन्सॉर बोर्डावर कोणतीही गोष्ट करण्यासाठी दबाव आणू नये. जे काही घडतंय, ते सामाजिक आणि धार्मिक दबावामुळे घडत आहे. आता सर्वांनाच समजतंय की CBFC ही एक कमकुवत संस्था आहे. तुम्ही जर त्यांच्यावर दबाव टाकलात, तर ते चित्रपटात लगेचच बदल करतील, अशी समस्या आता निर्माण झाली. मला कळत नाही, चित्रपटाला इतके कट्स कसे काय मिळाले? तब्बल २७ कट. आणि हे ठरवणारे तुम्ही कोण?”
विवेक अग्निहोत्री पुढे मुलाखतीत म्हणाले, मी देखील CBFC चा एक भाग आहे, पण तुम्ही मला विचाराल तर माझा विश्वास आहे की त्या मागे CBFC नसावे. मी चित्रपटावर कोणत्याही प्रकारचा बहिष्कार आणि चित्रपटावर बंदी घालण्याच्या विरोधात आहे. माझा भाषणस्वातंत्र्यावर विश्वास आहे. खरं तर, मी मुक्त भाषणावर विश्वास ठेवतो, मला वाटते की द्वेषयुक्त भाषणांना देखील परवानगी दिली पाहिजे. प्रेक्षक बुद्धिमान असतात. प्रेक्षकांना चित्रपट पाहू द्या आणि पाहिल्यानंतर गोष्टी पचवू द्या.
OMG 2 बद्दल बोलायचे झाले तर अक्षय सोबत पंकज त्रिपाठी, यामी गौतम महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित राय यांनी केले असून हा २०१२ मध्ये आलेल्या चित्रपटाचा सिक्वेल आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.