Joe Flaherty Death : प्रसिद्ध कॉमेडी अभिनेत्याचं निधन; मनोरंजन सृष्टीवर शोककाळा

Joe Flaherty Death news : प्रसिद्ध व्हिलन डॅनियल बालाजी यांचं वयाच्या ४८ व्या वर्षी निधन झालं. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्टारच्या निधनाने मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. जो फ्लेहर्टी यांनी वयाच्या ८२ व्या वर्षीय जगाचा निरोप घेतला.
Joe Flaherty Death
Joe Flaherty Death Instagram

Actor Joe Flaherty Passes Away:

मनोरंजन सृष्टीतून दु:खद घटना समोर आली आहे. काही आठवड्यांपूर्वी 'दंगल' फेम अभिनेत्री सुहाना भटनागरचं निधन झालं होतं. कमी वयात सुहानाचे निधन झाल्याने सर्व चाहते आश्चर्य व्यक्त करत होते. तर काही काही दिवसांपूर्वी दक्षिणेतील प्रसिद्ध व्हिलन डॅनियल बालाजी यांचं वयाच्या ४८ व्या वर्षी निधन झालं. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्टारच्या निधनाने मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. जो फ्लेहर्टी यांनी वयाच्या ८२ व्या वर्षीय जगाचा निरोप घेतला.

जो फ्लेहर्टी हे दीर्घ काळापासून आजारी होते. त्यामुळे जो यांचं निधन झाल्याचे सांगण्यात आलं आहे. ८२ वर्षीय अभिनेते जो यांच्या मृत्यूच्या वृत्ताला त्यांच्या मुलीने दुजोरा दिला आहे. जो यांनी त्याच्या कॉमेडी अभिनयाने जागतिक सिनेसृष्टीवर छाप सोडली आहे. अॅडम सँडलर यांनीही जो यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांचा अभिनयातील टायमिंग चाहत्यांच्या नेहमी लक्षात राहील.

Joe Flaherty Death
Pushpa 2 The Rule: अल्लु अर्जूनच्या 'पुष्पा 2: द रुल'च्या रिलीज डेटबाबत मोठी घोषणा, 'या' दिवशी येतोय भेटीला

प्लेहर्टी यांच्या निधनाच्या वृत्तामुळे चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. जो फ्लेहर्टी यांनी सिनेसृष्टीत भरीव योगदान दिल्याची भावना चाहते व्यक्त करत आहे.

Joe Flaherty Death
OTT Release April 2024: मनोरंजनाचा धमाका! 'फर्रे' ते 'सायलेंस 2' पर्यंत, OTT वर रिलीज होणार 7 चित्रपट-वेब सीरिज

जो फ्लेहर्टी हे एससीटीव्हीवरील कॉमडी शोमध्ये एक कलाकार आणि लेखक म्हणून त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली होती. जो फ्लेहर्टी यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली जात आहे. तर अनेकांनी त्यांच्या जुन्या आठवणींना सोशल मीडियावर पोस्ट करत उजाळा दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com