Sayali Sanjeev Birthday: वडिलांचा फोटो अन् हातात गुलाब; वाढदिवशीच सायली संजीव झाली भावूक

Sayali Sanjeev Emotional Post: आज अभिनेत्री सायली तिचा वाढदिवस साजरा करत आहे. सोशल मिडियावर सायलीने वाढदिवसानिमित्त भावूक पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
Entertainment News
Sayali Sanjeev BirthdaySaam Tv
Published On

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सायली संजीव आज लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. सायलीने अनेक मराठी चित्रपटांमधून तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. आज अभिनेत्री सायली तिचा वाढदिवस साजरा करत आहे. सोशल मिडियावर सायलीने वाढदिवसानिमित्त भावूक पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

Entertainment News
Myra Vaikul: मायरा वायकूळला 'या' बॉलिवूड सुपरस्टारसोबत करायचंय काम, व्यक्त केली मनातली इच्छा

सायलीने तिच्या इन्स्टाग्रामवर वाढदिवसादिवशी खास फोटो शेअर केला आहे. सायली वडिलांच्या आठवणीत अत्यंत भावूक झाली आहे. फोटोमध्ये तिने हातात वडिलांचा फोटो आणि गुलाबाची फुले घेतली आहेत. मिस यू असं कॅप्शन देत तिने हा फोटो इन्स्टाग्रामच्या स्टोरीवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये सायलीच्या समोर केक पाहायला मिळत आहे.

सायली वडिलांच्या फोटोकडे निरागसतेने पाहत आहे. सायलीचा आज वाढदिवस आहे आणि वडिलांच्या आठवणींना उजाळा देत सायली साजरा करताना दिसते आहे. वडिलांच्या फोटोसोबत तिने केक कट केला आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या सायलीच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सायलीला सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी देखील वाढदिवसांनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

Entertainment News
Ashok Saraf: 'साधं राहणीमान अन्...' पद्मश्री अशोक सराफ यांची एकूण संपत्ती किती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com