Video: सपना चौधरी म्हणतेय आहे माझीच हवा, तिच्या व्हिडिओने उडवलाय सगळीकडेच धुव्वा

सपना चौधरीचा नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Sapna Choudhary
New Video goes viral
Sapna Choudhary New Video goes viralSaam Tv

Sapna Choudhary New Video: हरियाणाची शान सपना चौधरी कायम चर्चेत आहे. सपना एक उत्तम डान्सर आहेच त्याचसोबत ती एक गायिका आणि अभिनेत्री देखील आहे. हरियाणवी नृत्यांगना सपना सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तसेच ती दररोज तिचे नवीन व्हिडिओ तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिच्या प्रोफेशनल आयुष्यासह अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमी चर्चेत असते. सपनाचा नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Sapna Choudhary
New Video goes viral
Bigg Boss Marathi 4: बिग बॉसनं दिला आश्चर्याचा धक्का, तेजस्वीनीला दाखवला घराबाहेरचा रस्ता

सपना चौधरीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सपना तिचा आउटफिट फ्लॉंट करताना दिसत आहे. विशेषतः ती तिचा घाघरा फ्लॉन्ट करताना दिसत आहेत. या व्हिडिओच्या बॅकग्राउंडमध्ये वाजणारे गाणेही घाघऱ्यावर आधारित आहे. हा व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडला आहे. अभिनेत्रीने गडद हिरव्या रंगाचा घागरा आणि गुलाबी रंगाची चोळी परिधान केली आहे. सपनाच्या चाहत्यांना तिची ही स्टाईल खूपच आवडली आहे. (Social Media)

हा व्हिडीओ शेअर करताना सपना चौधरीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'ये खबर छपी है अख़बार मे, हमारी खूब चरचा है बाज़ार में' (ही बातमी वर्तमानपत्रात आली, बाजारात माझीविषयी खूप चर्चा झाली). अभिनेत्री प्रत्येक वेळी तिच्या व्हिडिओंद्वारे सर्वांचे लक्ष वेधून घेते. स्टेज डान्सर म्हणून सपनाने खूप नाव कमावलं आहे. आज हरियाणात सपना चौधरी बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक मुली आहेत. सपना चौधरीला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. (Celebrity)

सपना चौधरीलाही बिग बॉस मुळे खूप प्रसिद्धी मिळाली. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर तिने अनेक गाणी मिळाली. सपनाने बॉलिवूडमध्येही तिची ओळख निर्माण केली आहे. तसेच सपना चौधरी तिच्या लग्नामुळे खूप चर्चेत असते. अभिनेत्रीही एका मुलाची आई झाली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com