
Sanjay Narvekar News : अभिनेता संजय नार्वेकरने हिंदी असो की मराठी सिनेसृष्टी या दोन्हीकडे त्याने त्याच्या अभिनयाची छाप सोडली आहे. संजय नार्वेकरच्या अभिनयाचा महाराष्ट्रात मोठा चाहता वर्ग आहे. संजय नार्वेकरने मराठी सिनेसृष्टीत अनेक हिट सिनेमे दिले आहेत.
सध्या संजय नार्वेकर सिनेमात क्वचितच मुख्य भूमिका साकारताना दिसतो. याचदरम्यान, संजय नार्वेकरचा रील्स डान्सचा एका व्हिडिओ चर्चेत आला आहे. या रील्समधील संजय नार्वेकरचा डान्स पाहून चाहत्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. (Latest Marathi News)
संजय नार्वेकर (Sanjay Narvekar) लवकरच 'कलावती' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाच्या शूटिंगसाठी संजय नार्वेकर याच्यासहित अनेक मराठी कलाकार (Artist) लंडनला पोहोचले आहेत. मराठी सिनेसृष्टीतील तगडे सिनेकलाकर शूटिंगसाठी लंडनला पोहोचले आहेत.
लंडनला शूटिंगदरम्यान, कॉन्टेन्ट क्रिएटर नील सालेकरने संजय नार्वेकरसोबत रील्स डान्स व्हिडिओ बनवला आहे. त्या दोघांचा रील्स व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या रील्समध्ये संजय नार्वेकर आणि नीलने मराठी सिनेमा जबरदस्त सिनेमातील 'आईचा घो' गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. दोघांनी केलेल्या डान्सला (Dance) चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे. अनेक चाहत्यांनी संजय नार्वेकरच्या 'जबरदस्त'सिनेमाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
या रील्स डान्सवर प्रतिक्रिया देताना एका युजरने म्हटले की, 'लहानपणी मी या गाण्यावर इतका फिदा होतो की, प्रत्येक गल्ली, चौक आणि शाळेत सर्व जागेवर नाचायचो. आज ही रील पाहून आठवण आली'. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले की, 'काय ती एनर्जी, काय ती स्टाईल, झक्कास एकदम...एकदम जबरदस्त'. अशा नानाविविध प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.
दोघांचा रील्समधील डान्स हा आतापर्यंत दहा लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर अडीच लाखांहून अधिक जणांनी लाईक केला आहे. तर हजाराहूंन अधिक जणांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.