Kapil Show: मी माझ्या बायको आणि गर्लफ्रेंडसोबत...; कपिल शर्माच्या शोमध्ये आलेल्या पाहुण्यामुळे संजय दत्त आणि सुनील शेट्टी आवाक

The Great Indian Kapil Show: कपिल शर्माच्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मध्ये संजय दत्त आणि सुनील शेट्टी आले होते. इथे त्यांच्यासमोर एका माणसाने त्याच्या गर्लफ्रेंड आणि पत्नीबद्दल असे काही सांगितले की = संजय दत्त सुनील शेट्टी आवाक झाले.
The Great Indian Kapil Show
The Great Indian Kapil ShowSaam Tv
Published On

The Great Indian Kapil Show: कपिल शर्माच्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मध्ये दोन बॉलीवूड स्टार्स संजय दत्त आणि सुनील शेट्टी नुकतेच आले होते. संजय दत्त आणि सुनील शेट्टी यांनी या मंचावर प्रेक्षकांचे मनोरंजन केले आणि त्यांचेही खूप मनोरंजन झाले. प्रेक्षकांपैकी एकाने तो त्याच्या बायको आणि गर्लफ्रेंडसोबत आल्याचे सांगितले असता संजय दत्त आणि सुनील शेट्टी आश्चर्यचकित झाले.

सुनील शेट्टी आणि संजय दत्त कपिल शर्माच्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मध्ये दिसणार आहेत. हा भाग खूप मनोरंजक असणार आहे. या शोमध्ये संजय दत्त आणि सुनील दत्त एकमेकांना चिडवताना दिसत आहेत. यावेळी समोर बसलेल्या गर्दीतील एका व्यक्तीने त्याची प्रेयसी आणि पत्नी दोघांची ओळख करून दिली तेव्हा दोघेही स्तब्ध होतात.

The Great Indian Kapil Show
Salman Khan: सलमान खानच्या डोळ्यात आलं पाणी; बिग बॉसमधील या स्पर्धकाची कहाणी ऐकून झाला भावुक

संजय दत्तने विचारले हे तुम्ही कसे केले

एक प्रेक्षक कपिलला बोलतो 'आज मी माझ्या प्रेयसी आणि पत्नी दोघांसोबत आलो आहे' असे म्हणतो आणि हे ऐकून सर्वजण आश्चर्यचकित होतात. कपिल शर्मा, अर्चना पूरण सिंग, संजय दत्त आणि सुनील शेट्टी हे सर्वजण स्तब्ध होतात. सुरुवातीला सुनील आणि संजय टाळ्या वाजवतात पण नंतर संजय प्रेक्षकांच्या मध्यभागी पोहोचतो आणि विचारतो तुम्ही हे कसे केले, आम्हालाही शिकवा. हे ऐकून कपिल आणि प्रेक्षक हसतात. याशोमध्ये संजय दत्तने स्वतः कबूल केले आहे की त्याच्या ३०० हून अधिक गर्लफ्रेंड होत्या.

The Great Indian Kapil Show
Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

लोक व्हिडिओवर कमेंट करत आहेत. एकाने लिहिले, 'संजय दत्त आणि सुनील शेट्टी आश्चर्यचकित झाले आहेत... पण भावाने उत्तम काम केले आहे.' दुसऱ्याने म्हटले, थांबा आणि पाहा, हा असा भाग असेल जो टीआरपी कमी करेल. दुसऱ्याने लिहिले, याला काम-जीवन संतुलन म्हणतात. तर एकाने गमतीने म्हटले, ही खूप मोठी गोष्ट आहे भाऊ, जेव्हा संजय दत्त स्वतः तुम्हाला विचारत असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com