

Sambhaji Raje Press Conference: 'हर हर महादेव' हा चित्रपट पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आमदार अमोल मिटकरीनंतर आता संभाजीराजे यांनी देखील या चित्रपटावर टीकास्त्र सोडले आहे. ऐतिहासिक चित्रपटातून इतिहासाचा विपर्यास होत असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले आहे. तसेच त्यांनी महेश मांजरेकर यांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटावरही आक्षेप घेतला आहे.
संभाजीराजे यांनी ऐतिहासिक चित्रपटांमध्ये इतिहास चुकीचा दाखवला जात असल्याचे म्हटले आहे. तसेच या चित्रपटांमध्ये इतिहासाची अवहेलना केला जात असल्याचेही म्हटले आहे. संभाजीराजे यांनी चित्रपटातील अभिनेते हे चित्रपटातील व्यक्तिरेखेला शोभत नसल्याचेही म्हटले आहे. (Latest News)
काय म्हणले आहेत संभाजीराजे छत्रपती ?
'छत्रपती शिवाजी महाराज आपली अस्मिता आहे, आपली प्रेरणा आहे. त्यांनी आपल्याला स्वराज्य दिले आहे. तुमच्याकडे सिनेमॅटिक लिबर्टी आहे म्हणुन तुम्ही काहीही कराल असे होत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट काढत आहात ही चांगली गोष्ट आहे. परंतु या चित्रपटांच्या माध्यमातून तुम्ही इतिहासाचा विपर्यास करत आहात. 'हर हर महादेव' सारख्या चित्रपटातून इतिहासाची मोडतोड होत आहे. 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेले कलाकार हे मावळे आहेत का? हा इतिहासाचा विपर्यास आहे. 'वेडात मराठे वीर दौडले सात' हा महेश मांजरेकरांचा सिनेमा आहे. त्यातील कलाकारांनी पगडी घातलेली नाही. पगडी काढणे म्हणजे शोक समजला जातो. चुकीचा इतिहास दाखवलात तर गाठ माझ्याशी आहे.
चित्रपट बनविण्याचे स्वतंत्र आहे म्हणुन आपण काही करायचं असं होत नाही. आपण पुस्तक वाचत नाही ही आपली चुक आहे. माझी राज्य सरकारला विनंती आहे त्यांनी याकडे लक्ष द्यावे. पुर्वीचे मराठे म्हणजे आपण सर्वजण. आपण सर्व अठरा पगड जाती. मराठी आणि मराठीमध्ये फरक करू नका, हे चालणार नाही आणि हे चालवून घेणार नाही. यासगळ्यात आपली सुद्धा चुक आहे. चित्रपटामध्ये काहीतरी दाखवतात आणि आपण बघतो.
सेन्साँर बोर्डात ऐतिहासिक समिती असावी. माझी भुमिका ही माझी भुमिका आहे. इतिहासाचा होत असलेला विपर्यास हे फारच गंभीर आहे म्हणून आज पत्रकार परिषद घेतली आहे. उद्या पुढे असे काही पिक्चर आले तर मी आडवा येणार. ज्यांनी ज्यांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे त्यांनी माझी पत्रकार परिषद दाखवा आणि विचार मी चुकीचे बोलत आहे का?
मी सगळ्या निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना सांगू इच्छितो, जर का तुम्ही असेच चित्रपट काढलात तर गाठ संभाजी छत्रपतींशी आहे. असे चित्रपट काढलात तर मीच आढावा येईन पण काही चुकीच केल तर खपवून घेतलं जाणार नाही. चित्रपट चांगले असतील तर त्याचे नक्कीच कौतुक करणार. शिवभक्त हुशार आहेत काय करायचं आहे ते करतील. मी जे बोलते ते करतो आणि करणार. इतिहासाचा विपर्यास होऊ देणार नाही. ती माझी जवाबदारी आहे.
या भूमिकेला शोभणार कोणताही कलाकार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करु शकतो. मग तो अक्षय कुमार असो किंवा अजून कोणी. त्याचे फक्त मन साफ असायला हवे. तुम्ही काहीही कराल, आज लेदर बेल्ड घालून आला आहेत, उद्या काय डान्स कराल. मी जेवढा मवाळ आहे, तेवढाच कडक पण आहे. अश्या गोष्टी घडत असतील तर कोणीतरी बोललं पाहिजे आणि या घराण्यात माझा जन्म झाला आहे म्हणून मी बोलत आहे. मी कायद्याचा तज्ञ नाही. कायद्यात बसत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीचा दाखवाल का? हे महाराष्ट्राला चालेल का?
'वेडात वीर दौडले सात' या चित्रपटामध्ये अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारा आहे. जय दुधाने, उत्कर्ष शिंदे, विकास निकम, विराट मडके, हार्दिक जोशी, सत्या मांजरेकर, अक्षय, नवाब खान आणि प्रवीण तरडे या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारणार आहेत. (Movie)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.